उपसंपादक : वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
वार गुरुवार दिनांक ११/०७/२०२४ रोजी नातेपुते येथील बुरुजा जवळील समाज भूषण हॉल येथे शिवसेनेच्या वतीने महायुतीचा बांधकाम कामगार यांना संसार उपयोगी भांड्याचे वाटपाचे शिबिर घेण्यात आले यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे बांधकाम कामगार संघटनेचे जिल्ह्याचे नेते साहेबांना तेगेळीअंकुश भाऊ सुर्वे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक सुर्वे वैभव रणभिसे सुरेश लिंबोळे नाव नोंदणी शुभारंभ व संसार उपयोगी साहित्याचे वाटप शिवसेनेचे नेते तथा नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त राजकुमार हिवरकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिराचे आयोजन बांधकाम कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष माऊली देशमुख, संदीप भागवत, राजू जाधव, अक्षय पवार यांनी या शिबिराचे आयोजन केले होत.
यावेळी व्यासपीठावरून बोलताना राजकुमार हिवरकर-पाटील म्हणाले देशाच्या स्वातंत्र्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होईपर्यंत कामगारांच्या हिताचा निर्णय आजपर्यंत घेतलेला यातील काही लाभार्थ्यांना दाखवावा संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, मंत्री सुरेश भाऊ खाडे साहेब, आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या योजना देण्याचे काम महायुतीच्या सरकारने केला आहे नव्यानेच "मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी" या योजनेच्या शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच महायुतीच्या नेत्यांनी या योजनेची घोषणा केली. सर्वसामान्य माता भगिनींना याचा लाभ घेता यावा यासाठी अभूतपूर्व असे नियमात बदल करण्यात आले म्हणून माझी आपणासमोर बसलेल्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीलाआणि मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांना विनंती आहे आपण लाभार्थी तर बनाच पण शासनाचे प्रचारक सुद्धा बना मग ही योजना तळागाळापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही.
माऊली देशमुख म्हणाले की, बांधकाम सभापती अतुलबापू पाटील हे बांधकाम कामगारसाठी वेळोवेळी सहकार्य करतात. आज २०० किलोमीटरवर हेलपाटे न घालता ५४७ माता-भगिनी आणि बांधकाम कामगार बांधव यांना आपण भांड्यांचा दहा हजाराचा सेट उपलब्ध झाला आहे. सरकारी काम चार दिवस थांब ही प्रवृत्ती न ठेवता राज्याचा मुख्यमंत्री संवेदनशील आहे सरकार गतिमान आहे हे सरकार कामगारांचा आहे शेतकऱ्यांचा आहे, विद्यार्थ्यांचा आहे, तरुणांचा आहे, ज्येष्ठ नागरिकांचा आहे, जो जो राष्ट्र निर्मितीमध्ये योगदान देणार आहे त्याचे हे सरकार आहे. अशी भूमिका ठेवून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करतात खऱ्या अर्थाने हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेला कानमंत्र 80 टक्के समाजकारण आणि 20% राजकारण याच धोरणावर शिवसेना काम करते म्हणून आपण सर्व एका छत्राखाली आलो आहोत आपल्याला मिळालेला लाभ इतरांपर्यंत कसा पोहोचेल त्याचाही विचार या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेऊन जा असं मत राजकुमार हिवरकर पाटील यांनी मांडले.
यावेळी प्रास्ताविक महेश लिंबोळे तर आभार विनायक सुर्वे यांनी मानले.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.