उपसंपादक वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
राज्याचे शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर साहेब यांना शिवसेनेचे नेते तथा नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त राजकुमार हिवरकर-पाटील यांनी निर्भया पथक, पोस्को कायदा, जाणीव जागृती प्रतिबंधात्मक योजना, व्यसनमुक्ती अमली पदार्थचे दुष्परिणाम, रस्ता सुरक्षितता व वाहतुकीचे नियम याबाबतचे मागणी पत्र रामटेक या त्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठकीत दिले. सोलापूर जिल्ह्यात तसेच माळशिरस तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील माध्यमिक, प्राथमिक व ज्युनिअर कॉलेज यामध्ये सर्व मुख्याध्यापकांची वरील विषयांसाठी बैठक आयोजित करणे गरजेचे आहे याबाबतचे निवेदन मी शिवसेनेच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय स्वतः आपण व आरोग्यमंत्री सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख ग्रामीण डीवायएस, जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, तालुक्याचे शिक्षणाधिकारी यांना ५/४/२०२४ रोजी दिलेली आहे.
बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती टाळायची असेल तर जिल्हा, तालुक्यासह प्रत्येक शाळेवर समित्या स्थापन करणे गरजेचे आहे. मुलींना गुड टच बॅड टच याची माहिती देणे हा कार्यक्रम कागदपत्रे न राहता तो सामाजिक उपक्रम म्हणून पुढे येणे गरजेचे आहे. कोणीतरी जनजागृती केली, कोणीतरी आवाज उठवला तरच या विषयाकडे पोलीस प्रशासन पाहत अन्यथा या विषयाकडे जाणीवपूर्वक डोळझाक केली जाते यासाठी पोलिसांना समितीच्या माध्यमातून सहकार्य करणे अपेक्षित आहे, प्रत्येक महिन्याला वरील गोष्टींचा आढावा घेणे गरजेचे आहे.
धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी महिलांसाठी काम केल म्हणून त्यांना लाखो महिला रांगेत उभे राहून राख्या बांधत असत. त्याच धर्तीवर राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजना आणून जिजाऊ सावित्रीच्या लेकींचा जागर केला म्हणूनच महिला वर्गामध्ये सुरक्षितच वातावरण निर्माण होऊ पाहत आहे झालेंआहे. तरी आपण वरील पत्राचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जिल्ह्यापासून ते प्रत्येक शाळेपर्यंत समित्या स्थापन करण्याची व सामाजिक कार्यकर्त्यांना यात सामावून घेण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांना करण्यात आली. यावर मा.ना.शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.