उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)
अत्यंत हलाखीची परिस्थिती असून सुद्धा माझ्या मुलाला मी पोलीस बनवणारच ह्या स्वप्नाला उराशी बाळगून मूळचे सदाशिवनगर येथील पिंटू ओवाळ सध्या राहणार पिंपरी चिंचवड आणि पिंपरी चिंचवड येथील भाजी मंडई मध्ये हमाली करणाऱ्या एका बापाचे स्वप्न पूर्ण करण्यात त्यांचा अनिकेत नावाचा मुलगा अवघ्या 20 व्या वर्षी सोलापूर एस आर पी एफ मध्ये पोलीस पदावर विराजमान झाला.
अनिकेत ओवाळ हे सध्या पदवीच्या दुसऱ्या वर्षामध्ये शिकत आहेत बारावी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी खूप कष्टाने आणि जिद्दीने अभ्यास करून पोलीस व्हायचं आणि वडिलांचे स्वप्न आहे की मुलाला वर्दी ही मिळालीच पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगून रात्रंदिवस अभ्यास करून अवघ्या दोनच वर्षात सोलापूर येथे झालेल्या एस आर पी एफ या पदासाठी गवसणी घातली आहे.
त्यांचं अभिनंदन करताना राजकुमार हिवरकर पाटील शिवसेना नेते तथा विश्वस्त नातेपुते एज्युकेशन सोसायटी म्हणाले की खूप कमी वयात मोठी जबाबदारी तुमच्यासारख्या वीर जवानांच्या हाती आली म्हणजे आपला भारत देश पूर्ण तरुणांच्या हाती आला तसेच बोलताना पुढे म्हणाले की वडिलांनी जी हालाखीची परिस्थिती बघितली ती माझ्या मुलाच्या नशिबात येऊ नये म्हणून त्यांनी अनिकेतला चांगले शिक्षण त्याचबरोबर संस्कार ही चांगले दिले. मूळचे सदाशिवनगर येथील रहिवासी असलेले ओवाळ कुटुंबीय आहे पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास गेले तिथे जाऊन त्यांनी मोलमजुरी करत पिंपरी चिंचवड भाजी मंडई येथे हमाली करत आहेत. हमाली करत असताना त्यांना रोज नवीन नवीन पोलीस आणि वर्दी याचं आकर्षण वाटू लागलं व माझ्या मुलाला मी पोलीसच बनवणार असं स्वप्न त्यांनी बाळगलं त्यातच बारावी झाल्यानंतर अनिकेत ने चांगला अभ्यास करून पोलीस पदी विराजमान झाला असे गौरवोद्गार काढले त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित भाजपाचे मनोज जाधव तेजस गोरे,विनोद बोराटे, रोहित ओवाळ, सोमनाथ भोसले, आदित्य सावंत, अनिकेत मिसाळ होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.