नातेपुते नगरपंचायतचे बांधकाम सभापती मा.अतुल(बापु) पाटील यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बार्शीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक बाळासाहेब चव्हाण यांनी कामकाज पाहिले.
नातेपुते ही पहिली ग्रामपंचायत होती, त्याचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाले. पहिला नगराध्यक्षा होण्याचा मान उत्कर्षांराणी पलंगे यांना मिळाला, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर नातेपुते नगराध्यक्षा म्हणून अनिता लांडगे या विराजमान झाल्या. उपनगराध्यक्षपदी मालोजीराजे देशमुख यांनी अडीच वर्ष कामकाज चालवले. मालोजीराजे देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली. उपनगरध्यक्षपदासाठी अतुल(बापु) पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. सर्व नगरसेवक यांनी एकमताने बिनविरोध निवड केली. निवड होताच फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
यावेळी उपसभापती मामासाहेब पांढरे, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष अनिता लांडगे, माजी नगराध्यक्षा उत्कर्षांराणी पलंगे, माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, नगरसेवक अॅड.बी.वाय राऊत, दादासाहेब उराडे, अॅड. रावसाहेब पांढरे, बाळासाहेब काळे, अविनाश दोशी, रणजित पांढरे, आणासाहेब पांढरे, सुरेंद्र सोरटे, दीपक काळे, शशिकांत बरडकर, संगीता काळे, स्वाती बावकर, दिपाली देशमुख, संजय पाटील, माऊली उराडे, संदीप ठोंबरे, रणजित काळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.