Skip to main content

Posts

नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

मामाश्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., नातेपुते या पतसंस्थेचा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन समारंभ होणार संपन्न

उपसंपादक वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ०५:१५ वा. मामाश्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ माजी उपमुख्यमंत्री मा.श्री.विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते व आमदार विधान परिषद मा.श्री.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. तसेच या कार्यक्रमप्रसंगी आमदार मा.श्री.रामभाऊ सातपुते, जिल्हा संघटन सरचिटणीस सोलापूर भाजपा मा.श्री.धर्यशीलभैय्या मोहिते-पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार विधान परिषद मा.श्री.रामहरी रुपनवर, मा.उपाध्यक्ष जि.प. सोलापूर मा.श्री.बाबाराजे देशमुख, माजी पोलीस पाटील नातेपुते समाजरत्न मा.श्री.राजेंद्रभाऊ पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत अकलूज मा.श्री.शिवतेजसिंह मोहिते-पाटील, मा.उपसभापती मा.श्री.अर्जुनसिंह मोहिते-पाटील, चेअरमन अहिल्यादेवी पतसंस्था मा.श्री.रघुनाथ (आण्णा) कवितके, नगराध्यक्ष नातेपुते नगरपंचायत मा.सौ.अनिता नंदू लांडगे, उपनगराध्यक्ष नातेपुते नगरपंचायत मा.श्री.मालोजीराजे देशमुख, नगरसे...

स.म.शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय नातेपुते येथे सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची जयंती साजरी

  स.म.शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयामध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची जयंती साजरी करताना मान्यवर उपसंपादक वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषणव वृत्तपत्र स.म.शंकरराव मोहिते-पाटील यांची १०५ वी जयंती स.म. शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय, नातेपुते येथे साजरी करण्यात आली. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व लोकनेते कै.प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जयंतीनिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला, जयंतीनिमित्त आलेल्या पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. तसेच सुनिल राऊत, श्रीकांत बाविसकर, अभिमन्यु आठवले, समिर सोरटे, सुनिल ढोबळे, सुनिल गजाकस या पत्रकारांचा हार,पेन,वही व गुलाब पुष्प देऊन पत्रकारांचा सन्मान करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रस्ताविक नलवडे सर यांनी केले.  तसेच गटशिक्षण अधिकारी धनंजय देशमुख म्हणाले की, सहकार महर्षींनी सर्वांगीनी महाराष्ट्राच स्वप्न पाहील होत. त्यादुष्टीने त्यांनी माळशिरस तालुक्याचा विकास केला. समाजातील बारिक-सारीक गोष्टी टिपण्याचे काम पत्रकार करीत असतात. विद्यार्थ्यांनी...

राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचा शिव विचार दहिगावात: माळशिरस तालुका प्रमुख (शिंदे गट) मा.राजकुमार हिवरकर-पाटील

          उपसंपादक वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र         राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे अवचित्य साधून माळशिरस तालुका शिवसेनेच्या वतीने दहिगाव येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना राजकुमार हिवरकर-पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांचे शिवसेनेचे नेते तथा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत साहेब व राज्य सचिव संजयजी माशेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची सामाजिक कार्याची घोड दोड सुरू आहे. आज राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दहिगाव गावात शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले हा योगायोग आहे.  हिंदुहृदय सम्राट यांनी ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण या पद्धतीची शिवसेनेची कार्यपद्धती निर्माण केली.  राष्ट्रमाता जिजाऊंनी तर आपला एक मुलगा युद्धात कटकारस्थानी मृत्यू पावला तरी सुद्धा हिंदवी स्वराज्याची स्थापन करण्यासाठी हिंदवी स्वराज्य निर्मिती करण्यासाठी दुसरा मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवण्याचं काम केल. आत्ताच्या माता अस म्हणता...

राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्ताने महिला वर्गासाठी शिवसेना (शिंदे गट) माळशिरस तालुका अध्यक्ष मा.श्री.राजकुमार हिवरकर-पाटील यांच्या वतीने अनोखी खास भेट

  राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्ताने महिला वर्गासाठी शिवसेना (शिंदे गट) माळशिरस तालुका अध्यक्ष मा.श्री.राजकुमार हिवरकर-पाटील यांच्या वतीने हरभरा डाळ व गव्हाचा आटा वाटप करताना उपसंपादक वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब, सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते तथा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत साहेब, शिवसेना सचिव संजयजी माशेलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून मकर संक्रांतीच्या सणासाठी महिलांसाठी भेट म्हणून ६० रुपये प्रति किलो हरभरा डाळ व २७ रुपये ५० पैसे प्रति किलो गव्हाचा आटा माता-भगिनींसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. दीपावलीच्या सणानिमित्त शिवसेनेच्या वतीने अशीच हरभरा डाळ उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास ९९००० माता-भगिनींना माळशिरस तालुक्यातील लाभ झाला. महाराष्ट्र सरकारच्यावतीने सुद्धा आनंदाचा शिधा मिळणार आहे. सामाजि...

श्री दत्त सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने पञकार दिनानिमित्त पञकारांचा सन्मान

उपसंपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र पञकारदिनाच्या औचित्याने पञकारांचा श्रीदत्त सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांच्या शुभहस्ते विशेष सन्मान करण्यात आला, समारंभाच्या व्यासपीठावर  जेष्ठ पञकार श्री.विलासजी भोसले,श्री.आनंदजी जाधव तसेच  श्री.सुनिलशेठ देशमुख,  श्री.चांदभाई काझी, श्री.सुनिलजी मैड,  श्री.कैलासशेठ सोनवणे,अमितजी चांगण उपस्थित होते. यावेळी उपस्थित पञकार मान्यवर  समीर सोरटे, उमेश पोतदार, श्रीराम महाराज भगत, सुनिल गजाकस,  सनी बावीसकर, अभिजीत म्हामणे, वैभव आठवले, ॲड.राजेंद्र पिसे सर,  सुनिल ढोबळे, हेमंत उराडे यांचा मान्यवर आणि विस्वस्थ पदाधिकारी यांनी सन्मान केला. यावेळी स्वागत प्रास्तावकिय मनोगत प्रतिष्ठानचे सचिव श्री.नंदकिशोर धालपे यांनी केले,पञकार बांधवाचे नातेपूतेच्या जडणघडणीतील मौलीक योगदान सर्वच क्षेञात मार्गदर्शनीय ठरते असे सांगीतले,लोकशाहीच्या चार स्तंभातील महत्वपुर्ण स्तंभ हा पञकारीतेचा असून त्याचे देशाच्या राष्ट्राच्या उभारणीत महत्वपुर्ण योगदान आहे असे नमुद केले. यानंतर विलास भोसले, आनंद जाधव, समीर सोरटे यांनी विश्वस्थ मंड...

पत्रकार बांधवांमुळेच लोकशाही टिकेल - मा.राजकुमार हिवरकर-पाटील (माळशिरस तालुका प्रमुख शिवसेना शिंदेगट)

उपसंपादक वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब, सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तथा शिवसेनेचे नेते शिवाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्यावतीने पत्रकार दिन शिवसेना भवनावर साजरा करण्यात आला. शिवसेनेची माळशिरस तालुक्याची सामाजिक उपक्रमाची वाटचाल चौफेर चालू आहे.  आज बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे संस्थापक असणारे बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी केली. यावेळी पत्रकार बांधवांचा गुलापुष्प व शिवसेनेचे वतीने गिफ्ट देऊन सन्मान करण्यात आला.  समाजातील वंचित बहुजन, सुशिक्षित, असुशिक्षित, दिन-दलित महिला, पुरुष वंचित घटकांना न्याय द्यायच काम पत्रकारांच्या लेखणीतून होत असत. पत्रकाराने सामाजिक कामात योगदान दिल्याने बऱ्याचदा रोशास सामोरे जाव लागत, परंतु पत्रकारिता जर लोकशाहीच्या स्तंभाला अभिप्रेत अशी झाली नाही तर समाजातील वरील घटकांना न्याय मिळू शकत नाही. मी माझ्या शिवसेनेच्या सतरा-अठरा महिन्याच्या कालखंडामध्ये पत्रकार बांधवांच्या सामा...

६ जानेवारी पत्रकार दिन साजरा का करायचा. पत्रकारिता पूर्वीची आणि सध्याच्या काळातील याबाबत एक लेखाजोखा

उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण बाळशास्त्री जांभेकर यांनी सन १८३२ मध्ये  “दर्पण”  हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केले म्हणून त्यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणतात. तसेच पहिले संपादक व पत्रकार म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांनी १८४० मध्ये  “दिग्दर्शन”  मराठी मासिक सुरू केले. या मासिकाचा उद्देश विज्ञानाचा परिचय असा होता. त्यांनी विविध विषयावर पाठयपुस्तके तयार केली. बाळशास्त्री जांभेकर इतिहासाचे व्यासंग होते. शिलालेख व ताम्रपट इत्यादींचा अभ्यास करून ऐतिहासिक लेख लिहले. शोध निबंध यावरती सुद्धा लिखाण केले. त्यांना महाराष्ट्रातील  “आद्य इतिहास संशोधन”  म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रात पुरोगामी विचार सरणीचा पाया बाळशास्त्री जांभेकर यांनी घातला त्यामुळे त्यांना  “आद्य समाजसुधारक”  व  “सुधारणा वादाचे प्रवर्तक”  म्हणून ओळखले जातात.            बाळ शास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी रोजी वृत्तपत्र चालू केले म्हणून हा दिवस “पत्रकार दिन” म्हणून साजरा केला जातो. पूर्वीची पत्रकारिता ही रोखठोक ,  सडेतोड , ...