राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्ताने महिला वर्गासाठी शिवसेना (शिंदे गट) माळशिरस तालुका अध्यक्ष मा.श्री.राजकुमार हिवरकर-पाटील यांच्या वतीने हरभरा डाळ व गव्हाचा आटा वाटप करताना |
उपसंपादक वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब, सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते तथा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत साहेब, शिवसेना सचिव संजयजी माशेलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून मकर संक्रांतीच्या सणासाठी महिलांसाठी भेट म्हणून ६० रुपये प्रति किलो हरभरा डाळ व २७ रुपये ५० पैसे प्रति किलो गव्हाचा आटा माता-भगिनींसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. दीपावलीच्या सणानिमित्त शिवसेनेच्या वतीने अशीच हरभरा डाळ उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास ९९००० माता-भगिनींना माळशिरस तालुक्यातील लाभ झाला. महाराष्ट्र सरकारच्यावतीने सुद्धा आनंदाचा शिधा मिळणार आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून गोरगरिबांच्या घरी मकर संक्रांतीचा उत्सव सण आनंदात साजरा व्हावा म्हणून आज राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याबाबतची जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियावरून बचत गटातील महिला, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संघटना, सामाजिक क्षेत्रात काम करणारे समाज बांधव, माता -भगिनी यांच्या माध्यमातून सोशल मीडियावरून याची जोरदार जाहिरात करण्यात आलेली आहे. यापुढे सुद्धा असेच सामाजिक उत्तम काम राबवण्याचे माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार-हिवरकर पाटील यांनी जाहीर केले.
दिवाळीच्या निमित्ताने वाटलेली डाळीची एवढी जाहिरात झाली की, रात्री मेसेज केले आणि सकाळपासून जेष्ठ नागरिक माता-भगिनी गिरवी, मांडवे, पिंपरी, नातेपुते, फोंडशिरस, दहिगाव, पिरळे, कुरबावी, शिंदेवाडी, हनुमानवाडी आदी भागातून नागरिकांनी लाभ घेण्यास सुरुवात केली. कोणत्याही महापुरुषांना जातीपातीत बांधता येणार नाही, त्यांचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रत्येक समाज बांधवाची आहे, समाजातील घटकाची आहे त्याचबरोबर दिवाळी जसा उच्चांक झाला तसाच उच्चांक आताही होणार असे मत यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांनी व्यक्त केल.
दहिगाव येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करताना राजकुमार हिवरकर-पाटील व असंख्य कार्यकर्ते |
यावेळी माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील, शहर प्रमुख पोपटराव शिंदे, गटनेते दादाभाई मुलाणी, भाजपचे मनोज जाधव, भाजपाचे सुनीलजी बनकर, प्रभाग १३ चे प्रमुख सोनू लांडगे, पीरळेचे शाखाप्रमुख आकाश खिलारे, दहिगावचे शाखाप्रमुख विजय सरवदे, पप्पू मोहिते, क्रांतिवीर बांधकाम संघटनेचे सचिव माऊली देशमुख, जावेद भाई, राजाराम हिवरकर, प्रमोद चिकणे, मोहन तात्या हिवरकर, क्रांतिवीर बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप भागवत, दहिगाव शाखेचे उपप्रमुख दत्ता बोडरे, दादा केंगार, प्रमोद फुले, ज्ञानेश्वर पाटोळे, आकाश बनकर, विजय ढेकळे महादेव गोसावी आदी शिवसेनेचे नेते पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.