पञकारदिनाच्या औचित्याने पञकारांचा श्रीदत्त सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांच्या शुभहस्ते विशेष सन्मान करण्यात आला, समारंभाच्या व्यासपीठावर जेष्ठ पञकार श्री.विलासजी भोसले,श्री.आनंदजी जाधव तसेच श्री.सुनिलशेठ देशमुख, श्री.चांदभाई काझी, श्री.सुनिलजी मैड, श्री.कैलासशेठ सोनवणे,अमितजी चांगण उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पञकार मान्यवर समीर सोरटे, उमेश पोतदार, श्रीराम महाराज भगत, सुनिल गजाकस, सनी बावीसकर, अभिजीत म्हामणे, वैभव आठवले, ॲड.राजेंद्र पिसे सर, सुनिल ढोबळे, हेमंत उराडे यांचा मान्यवर आणि विस्वस्थ पदाधिकारी यांनी सन्मान केला.
यावेळी स्वागत प्रास्तावकिय मनोगत प्रतिष्ठानचे सचिव श्री.नंदकिशोर धालपे यांनी केले,पञकार बांधवाचे नातेपूतेच्या जडणघडणीतील मौलीक योगदान सर्वच क्षेञात मार्गदर्शनीय ठरते असे सांगीतले,लोकशाहीच्या चार स्तंभातील महत्वपुर्ण स्तंभ हा पञकारीतेचा असून त्याचे देशाच्या राष्ट्राच्या उभारणीत महत्वपुर्ण योगदान आहे असे नमुद केले.
यानंतर विलास भोसले, आनंद जाधव, समीर सोरटे यांनी विश्वस्थ मंडळाला शूभेच्छा देवुन मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. तसेच संस्थेने दत्तजयंती सोहळा किर्तन, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर आयोजित करून सामाजिक सेवेच्या वाटचालीस सुरवात केली त्याचे कौतुक केले आणि प्रतिष्ठानला शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पदमन, उपाध्यक्ष शिवम उराडे, सहसचिव शक्ति पलंगे,खजिनदार रवींद्र ठोंबरे,विश्वस्थ संजय उराडे, संजय चांगण,रवी कोतमिरे,धर्मनाथ राउत,उमेश बरडकर,सागर लोंढे, राहुल सोनवळ,अवी लिपारे उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.