उपसंपादक वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब, सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तथा शिवसेनेचे नेते शिवाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्यावतीने पत्रकार दिन शिवसेना भवनावर साजरा करण्यात आला. शिवसेनेची माळशिरस तालुक्याची सामाजिक उपक्रमाची वाटचाल चौफेर चालू आहे.
आज बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे संस्थापक असणारे बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी केली. यावेळी पत्रकार बांधवांचा गुलापुष्प व शिवसेनेचे वतीने गिफ्ट देऊन सन्मान करण्यात आला.
समाजातील वंचित बहुजन, सुशिक्षित, असुशिक्षित, दिन-दलित महिला, पुरुष वंचित घटकांना न्याय द्यायच काम पत्रकारांच्या लेखणीतून होत असत. पत्रकाराने सामाजिक कामात योगदान दिल्याने बऱ्याचदा रोशास सामोरे जाव लागत, परंतु पत्रकारिता जर लोकशाहीच्या स्तंभाला अभिप्रेत अशी झाली नाही तर समाजातील वरील घटकांना न्याय मिळू शकत नाही. मी माझ्या शिवसेनेच्या सतरा-अठरा महिन्याच्या कालखंडामध्ये पत्रकार बांधवांच्या सामाजिक योगदानामुळेच शिवसेनेने राबवलेले सर्व सामाजिक उपक्रम समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवू शकलो. त्यामध्ये दिवाळीच्या निमित्त वाटप झालेले दाळ असेल, नातेपुते ग्रामीण रुग्णालयाला मिळवून दिलेली अंबुलन्स असेल, ३८ हजार माता-भगिनींची केलेली तपासणी असेल, एक लाख वीस हजार शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यावर केलेला मोफत औषध उपचार असेल, नारी शक्तीचा सन्मान म्हणून बचत गटातील महिलांना २७ रेशन दुकान उपलब्ध करून दिलेली योजना असेल, ६१५० माळशिरस तालुक्यातील रुग्णांना मोफत ऑपरेशन करून त्यांना मिळवून दिलेल्या न्याय असेल, नातेपुते ग्रामीण रुग्णालयात बांधलेली संरक्षित भिंत असेल, त्याचबरोबर नातेपुते ग्रामीण रुग्णालयात एक कोटी २५ लाख रुपयांचा खर्चून पुणे मुंबईच्या धर्तीवर बांधलेला ऑपरेशन थेटर असेल ते सगळ शक्य झाल ते माझ्या पत्रकार बांधवांमुळे झाल. समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय देण्याचे काम पत्रकार बांधवांमुळे होऊ शकते. प्रशासनातील उनिवा त्याविरोधातू केलेल काम, प्रसारमाध्यमांनी घेतली दखल यामुळे शिवसेना ही लोकांच्या घराघरात पोहचली. शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण याहीपुढे जाऊन माळशिरस तालुक्यात मी शिवसेनेचा तालुकाप्रमुख म्हणून शंभर टक्के समाजकारण करून पक्ष सर्वसामान्यांचा हाकेचा पक्ष बनला हे फक्त आपल्या सर्वांच्या योगदान यामुळे शक्य झाले, भविष्यात सुद्धा शिवसेना सामाजिक उपक्रमात राहील असे मत शिवसेनेचे माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी पत्रकार आनंदराव जाधव, घूगरदरे काका, पत्रकार पिसे सर, पत्रकार समीरजी सोरटे, पत्रकार अभिमन्यू आठवले साहेब, पत्रकार अमित सोरटे, पत्रकार विलास भोसले सर, पत्रकार भगत महाराज, पत्रकार महामुने सर, पत्रकार माने सर, पत्रकार सुनील जी गजाकस, पत्रकार बापू बाविस्कर, पत्रकार शोभा वाघमोडे, पत्रकार तानाजीराव वाघमोडे, सुनील जी ढोबळे पत्रकार, पत्रकार माने यांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी शिवसेनेचे माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील, तालुकाप्रमुख प्रमोद चिकणे सर, प्रभाग तेराचे प्रमुख सोनू लांडगे, अलंकापुरीचे शाखाप्रमुख विजय ढेकळे, पिरळे शाखाप्रमुख आकाश खिलारे, जय महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप भागवत, सचिव माऊली देशमुख, पप्पू मोहिते, दत्ता बोडरे, विजय सरवदे आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.