उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण
बाळशास्त्री जांभेकर यांनी सन १८३२ मध्ये “दर्पण” हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केले म्हणून त्यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणतात. तसेच पहिले संपादक व पत्रकार म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांनी १८४० मध्ये “दिग्दर्शन” मराठी मासिक सुरू केले. या मासिकाचा उद्देश विज्ञानाचा परिचय असा होता. त्यांनी विविध विषयावर पाठयपुस्तके तयार केली. बाळशास्त्री जांभेकर इतिहासाचे व्यासंग होते. शिलालेख व ताम्रपट इत्यादींचा अभ्यास करून ऐतिहासिक लेख लिहले. शोध निबंध यावरती सुद्धा लिखाण केले. त्यांना महाराष्ट्रातील “आद्य इतिहास संशोधन” म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रात पुरोगामी विचार सरणीचा पाया बाळशास्त्री जांभेकर यांनी घातला त्यामुळे त्यांना “आद्य समाजसुधारक” व “सुधारणा वादाचे प्रवर्तक” म्हणून ओळखले जातात.
बाळ शास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी रोजी वृत्तपत्र चालू केले म्हणून हा दिवस “पत्रकार दिन” म्हणून साजरा केला जातो. पूर्वीची पत्रकारिता ही रोखठोक, सडेतोड, बिनधास्त, निर्भिड अशी होती. संपादक, पत्रकारांना घाबरत होती, पत्रकारांचा दरारा होता, जी घटना घडते त्यावरतीच पत्रकार लिखाण करून चांगले काय, वाईट काय याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवत असत. संपादक, पत्रकाराची भीती त्याकाळात होती, पत्रकारांच्या नादी कोणी लागत नव्हते. पत्रकार हा लोकशाहीचा “चौथा खांब” खर्याअर्थाने होता. त्यावेळचे पत्रकार यांची जनमाणसात दहशत होती त्यामुळे संपादक पत्रकारांना महत्व होते. त्यावेळचे संपादक काहीही झाले तरी वृत्तपत्र चालविण्यासाठी पदरमोड करून वृत्तपत्र चालवायचे, कोणावर विसंबून राहत नव्हते परंतु काळ बदलत गेला आणि संपादक, पत्रकार मवाळ झाले. सध्या पत्रकारिता करण्यासाठी असंख्य तरुण, शिक्षक पुढे आले आहेत.
सध्या पत्रकारितेला वाळवी लागली आहे. संपादक पत्रकार आपआपल्या परीने गुलाम झाले आहेत, लाचार झाले आहेत. सध्या अनेकांना वाटते की, पत्रकारिता म्हणजे पैसे कमविणे असेच वाटू लागले आहे. पत्रकारिता करणे काही बंधन नाही, सध्याच्या काळात पत्रकारिता मवाळच करावी लागत आहे. पत्रकारिता म्हणजे मान-सन्मान असे वाटू लागले आहे परंतु तसे नाही. पत्रकारांना काही मानधन नसते, मिळणार्या जाहिरातीच्या कमिशनवर घर प्रपंचा चालवायला लागत आहे. बोटावर मोजण्या इतपतच पत्रकार प्रामाणिक आहेत आणि त्यांचे नाव लौकिक आहे.
महाराष्ट्राच्या सध्याच्या काळात नवीन पत्रकार झालेले जे आहेत त्यांना पत्रकारिता म्हणजे मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे असे घमेंडीत वावरत आहेत व पैशासाठी ब्लॅकमेल करून रोजारोटीचा प्रश्न सोडवत आहेत. तसेच तोतया पत्रकार ही असंख्य पाहायला मिळत आहेत. सध्या दलाल चिरीमिरी घेवून पत्रकारिता करीत आहेत त्यांच्यामुळे पत्रकारितेला ग्रहण लागले आहे. पत्रकारांनी पत्रकारितेची वाट लावली आहे त्यामध्येही पत्रकार पत्रकाराचे दुश्मन झाले आहेत ते मी पाहत आहे. पत्रकारिता ही विस्तव आहे, वेळ आल्यावर चटके देते त्याची वेदना कायम राहते. मी शोध पत्रकारिता करीत आहे. विषय शोधून त्यावरती लिखाण करतो व जनतेपर्यंत पोहोचवतो. मी मवाळवादी व जहालवादी अशीच पत्रकारिता करतो, मी मोडेन पण वाकणार नाही अशी माझी मानसिकता झाली आहे. भित्रेपणा माझ्या रक्तात नाही, मी घायाळ होणार नाही, घायाळ करतो त्यामुळे पत्रकारांनी पत्रकारितेचा मान ठेवून पत्रकारिता करावी. पत्रकारितेला गालबोट लागेल असे करू नये. पत्रकार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.