Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

महापुरुषांना कोणीही जाती-पातीच्या भिंतीत बांधू शकत नाही: राजकुमार हिवरकर पाटील

उपसंपादक वैभव आठवले

सावित्रीमाई फुले यांची १९३ वी जयंती नातेपुते ग्रामीण रुग्णालयात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, कार्यसम्राट आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब, सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांच्या सूचनेने स्त्रीशक्तीचा सन्मान म्हणून गरोदर मातांची तपासणी करून ज्येष्ठ नागरिक माता-भगिनींना गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला त्यांना समुपदेशन करण्यात आले. 

यावेळी बोलताना राजकुमार पाटील म्हणाले की, सावित्रीमाई फुले यांनी समाज सुधारण्याचा खूप मोठा टप्पा पार केला म्हणून आज गावच्या सरपंच महिला शिक्षिका, शासकीय अधिकारी, आमदार, खासदार, पंतप्रधान राष्ट्रपती या ठिकाणी महिला दिसतात. त्या फक्त सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री-शिक्षणाची क्रांती म्हणून सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात केशवपतनाची परंपरा नाभिक समाजाला बरोबर घेऊन त्यांची जनजागृती करून त्यावेळचे हिंदुस्थानातल मोठ आंदोलन उभ केल. त्यामुळे महिलांना पतीच्या देहांतानंतर केशव पतन करून विद्रूप केलं जायचं की प्रथाच सावित्रीमाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांनी बंद केली. महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतली, राष्ट्रमाता जिजाऊकडून प्रेरणा घेतली आणि त्या प्रेरणेतून स्त्री शिक्षणाचा जागर केला आणि समाज व्यवस्था बदलण्यासाठी सावित्रीमाई फुले यांना  शिक्षण दिलं. पहिली शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका या सावित्रीमाई फुले झाल्या. सावित्रीमाई फुले यांनी फातिमा बेबी कौर या मुस्लिम महिलेला शिक्षण देऊन शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा बनवले. त्यामुळे सर्व जाती-धर्मात त्या महापुरुषांचा, समाजसुधारकांचा हा तर सदैव स्तर उंची राहील त्यामुळे कोणत्याही समाजसुधारकांना महापुरुषांना जातीपातीच्या भिंतीत न बांधता येणार नाही असे मत यावेळी व्यक्त केले. 

यावेळी औषध निर्माण अधिकारी देवकाते सर यांनी मनोगत व्यक्त केलं, या कार्यक्रमचे डॉ. वाघमोडे यांनी सूत्रसंचालन केल. शिवसेनेचे माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील नातेपुते शहराध्यक्ष, पोपटराव शिंदे, शिवसेनेचे गटनेते दादाभाई मुलाणी, प्रभाग 7 प्रमुख सनी बरडकर, प्रभाग १३ चे राजू मुलाणी, तालुका उपप्रमुख प्रमोद चिकणे सर भैया ठोंबरे, डॉ.नम्रता होरा मॅडम,  वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिवाजी शेंडगे , डॉ. सुजाता आंधळकर ,  संजय देवकाते , साधना दोलताडे , रंजना मदने सिस्टर , विद्या कुंभार सिस्टर , पाखरे सिस्टर,  भूषण दळवी,   संभाजी मैद,  संतोष नडे , जावेद मुलाणी , नवनाथ भोसले आदी उपस्थित होते.

 महापुरुषांना कोणीही जाती-पातीच्या भिंतीत बांधू शकत नाही: राजकुमार हिवरकर पाटील

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसेलजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.


Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...