उपसंपादक वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे अवचित्य साधून माळशिरस तालुका शिवसेनेच्या वतीने दहिगाव येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना राजकुमार हिवरकर-पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांचे शिवसेनेचे नेते तथा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत साहेब व राज्य सचिव संजयजी माशेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची सामाजिक कार्याची घोड दोड सुरू आहे. आज राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दहिगाव गावात शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले हा योगायोग आहे. हिंदुहृदय सम्राट यांनी ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण या पद्धतीची शिवसेनेची कार्यपद्धती निर्माण केली.
राष्ट्रमाता जिजाऊंनी तर आपला एक मुलगा युद्धात कटकारस्थानी मृत्यू पावला तरी सुद्धा हिंदवी स्वराज्याची स्थापन करण्यासाठी हिंदवी स्वराज्य निर्मिती करण्यासाठी दुसरा मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवण्याचं काम केल. आत्ताच्या माता अस म्हणतात की, माझा मुलगा नाही शिकला तर चालेल पण त्याला पाच बोट सुद्धा लावू नका अशी मागणी किंवा विनंती शिक्षकांना केली जाते. समाजात राजमातांनी जर त्याग केला नसता तर तुमचे आमचे हिंदुत्व सुद्धा शाबित राहिले नसत याची जाणीव तमाम माता-भगिनीने ठेवली पाहिजे. राष्ट्रमाता जिजाऊंचाच आदर्श घेऊन छत्रपतींचा आदर्श घेऊन महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेड रोवली म्हणूनच गावच्या प्रथम नागरिक सरपंच महिला आहे, राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत याची सुद्धा जाणीव आपल्याला असली पाहिजे. त्याहीपुढे जाऊन आपण १०० टक्के समाजकारणाची कामे शिवसेनेच्या माळशिरस तालुक्याचे अध्यक्ष नात्याने करत आहे.
मा.साहेबांच्या जयंतीनिमित्त आज आपण माळशिरस तालुक्यामध्ये सवलतीच्या दरात हरभरा डाळ ६० रुपये प्रति किलो व गव्हाचा आटा २७ रुपये ५० पैसे या दराने माता-भगिनींसाठी चालू केला आहे. त्याचबरोबर दीपावलीच्या वेळी ९९ हजार माता भगिनींच्या घरापर्यंत शिवसेनेच्या वतीने सवलतीच्या दरात हरभरा डाळ पोहोचवण्याच काम केल, ६१५० ऑपरेशन करून दबलेल्या पिचलेल्या घटकाला न्याय द्यायच काम केल. शिवसेना समाजातील शेवटच्या घटकाला आपली वाटली पाहिजे अशा पद्धतीने काम शिवसेनेच्या शाखाप्रमुख असतील, पदाधिकारी असतील, नेते असतील यांनी केल पाहिजे.
राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, आजवरच्या मुख्यमंत्र्यांनी गोरगरिबांसाठी कधी एवढे चांगले निर्णय घेतले नाहीत तेवढे काम मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी केले आहे. माळशिरस तालुक्यातील बचत गट त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे काम शिवसेना करणार आहे. आजच्या शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब, जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत साहेब, राज्यसचिव संजयजी माशेलकर साहेब यांच्या वतीने शब्द देतो की, थोड्याच दिवसात गुरसाळे, दहिगाव आणि पिरळेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र दहिगाव येथे मंजूर करण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे आणि तात्काळ पूर्ण करण्यासंदर्भात हालचाली करण्यात येतील. भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या हस्ते करण्यात येईल. त्यामुळे येथील पंचक्रोशीतील माता-भगिनींची गरोदरपणात होणारी हेलसांड थांबणार आहे, त्यांना तातडीची वैद्यकीय सेवा घ्यायची झाली असता नातेपुते येथे येऊन घ्यावी लागते किंवा वालचंदनगर येथे जावे लागते, वेळ प्रसंगी काही प्रसंग जीवावर बेतते अशी निर्माण होते त्यांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जळगाव येथे करण्यासंदर्भात आपण सर्वांच्या साक्षीने प्रयत्न करू अभिवचन या निमित्ताने देतो. यावेळी सरपंच सोनम खिलारे, उपसरपंच आशाताई फुले यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व ज्ञानपीठ स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आल.
यावेळी माळशिरस तालुक्याचे शिवसेनेचे प्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील, नातेपुते शहर प्रमुख पोपटराव शिंदे, गटनेते दादाभाई मुलाणी, भाजपाचे मनोज जाधव, पिरळेचे शाखाप्रमुख आकाश खिलारे, अलंकापुरीचे शाखाप्रमुख विजय ढेकळे, दहिगाव ते शाखाप्रमुख विजय सरवदे, उपप्रमुख दत्ता बोडरे, प्रमोद चिकणे, राजाराम हिवरकर, श्रीकांत हिवरकर, अनिल फुले, महावीर फुले, पप्पू मोहिते, दादा केंगार, प्रमोद फुले, ज्ञानेश्वर पाटोळे, आकाश बनकर, आजिनाथ सपकाळ, सुरज कांबळे, संतोष कंगने, मंगेश शिंदे, अनिल माने, सिद्धार्थ सोनवणे, लखन कांबळे, अविनाश नामदास, शिवाजी कांबळे आदी शिवसैनिक नेते पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.