स.म.शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयामध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची जयंती साजरी करताना मान्यवर |
उपसंपादक वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषणव वृत्तपत्र
स.म.शंकरराव मोहिते-पाटील यांची १०५ वी जयंती स.म. शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय, नातेपुते येथे साजरी करण्यात आली. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व लोकनेते कै.प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जयंतीनिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला, जयंतीनिमित्त आलेल्या पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.
तसेच सुनिल राऊत, श्रीकांत बाविसकर, अभिमन्यु आठवले, समिर सोरटे, सुनिल ढोबळे, सुनिल गजाकस या पत्रकारांचा हार,पेन,वही व गुलाब पुष्प देऊन पत्रकारांचा सन्मान करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रस्ताविक नलवडे सर यांनी केले.
तसेच गटशिक्षण अधिकारी धनंजय देशमुख म्हणाले की, सहकार महर्षींनी सर्वांगीनी महाराष्ट्राच स्वप्न पाहील होत. त्यादुष्टीने त्यांनी माळशिरस तालुक्याचा विकास केला. समाजातील बारिक-सारीक गोष्टी टिपण्याचे काम पत्रकार करीत असतात. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे व त्यांनी आपल ध्येय निश्चित करावे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.चंद्रकांत कोळेकर सर म्हणाले की, मी माझ भाग्य समजतो की, मी महर्षींच्या तालुक्यात जन्माला आलो. गोरगरीब, कष्टकरी व शेतकर्यांसाठी सहकार महर्षी शंकरराव मोहित-पाटील यांनी फार मोठ काम केले आहे. तसेच अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास गटशिक्षण अधिकारी धनंजय देशमुख, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य चंद्रकांत कोळेकर सर, रिपाईंचे नेते एन.के.साळवे, नातेपुते पोलीस स्टेशनचे पी.एस.आय विक्रांत ढिगे साहेब, विनोद रणदिवे, सागर मदने, पोलीस अमित भगत व सर्व शिक्षक,शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन शेख सर यांनी केले व आभार प्रा.उत्तम सावंत सर यांनी मानले.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.