मा.श्री.अतुल(बापू) राजेंद्र पाटील |
नातेपुते ता.माळशिरस येथील समाजरत्न राजेंद्र
(भाऊ) पाटील यांचे चिरंजीव मा.श्री.अतुल (बापू) राजेंद्र पाटील म्हणजे आपुलकीचे नाते
जोडणारे, चालते बोलते विचारपीठ आहेत. प्रेमळ माणूस, माणुसकीचा
झरा जपणारे उच्च शिक्षित व्यक्तिमत्त्व म्हणून नावलौकिक मिळवला आहे. सदैव विनयशील म्हणून
त्यांच्याकडे बघितले जाते. कुशल बागायतदार असून संपत्तीचा कधी गर्व नाही. नातेपुते
ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच म्हणून दोन वेळा पदभार स्वीकारला. नातेपुते ग्रामपंचायतचे
रूपांतर नगरपंचायत मध्ये झाल्याने व निवडणूक लागली, निकाल लागला
आणि मा.श्री. अतुल(बापू) राजेंद्र पाटील प्रभाग क्र.१ मधून नगरसेवक म्हणून निवडून आले.
प्रत्येक प्रभागात निवडून येण्याचा विक्रम केला आहे. बापूंकडे “मीपणा” नाही.
जोडली गेलेली माणस बापूंपासून कधीही दूर जात नाहीत. साधी राहणी, उच्च विचारसरणी म्हणून बापूंकडे पाहिले जाते.
नातेपुते नगरपंचायतमध्ये नगरसेवक म्हणून प्रवेश झाला आहे परंतु महिलांसाठी आरक्षित राखीव झाले असल्यामुळे महिलांना नगराध्यक्ष होण्याचा मान मिळणार आहे. परंतु उपनगराध्यक्ष म्हणून अतुल(बापू) राजेंद्र पाटील विराजमान होतील यात काही शंका नाही. त्यांच्यातील आपलेपणा लहान, थोरांना प्रेरणादायी वाटत आहे. पदाधिकारी झाला म्हणून बापुनी माणुसकी सोडली नाही. जपलेली माणसं हीच माझी दौलत आहे व त्यांच्या असलेल्या अडी-अडचणी, विकासात्मक कामे करणे यासाठी जागृत राहत आहेत. जनतेने दिलेल्या पवित्र मताचा आधार ठेवून आपले कर्तव्य बजावत असतात. एक काळजीवाहू म्हणून बापूंकडे पाहिले जाते. त्यांनी नातेपुते ग्रामपंचायत असताना ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावली. बापू जात असताना कोणीही लहान थोरांनी हाक मारु दया तेथे ते थांबणारच, तोंड भरून बोलणारच ही बापूंची माणुसकी प्रत्येकाला भारावून जाते त्यामुळे मा.श्री.अतुल(बापू) राजेंद्र पाटील नूतन नगरसेवक ते उपनगराध्यक्ष म्हणून विराजमान होतील. अतुल(बापू) राजेंद्र पाटील “चालते बोलते विचारपीठ” आहेत. वडील समाजरत्न राजेंद्र (भाऊ) पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून सामाजिक जबाबदारी समजून आदर्श अशी कामगिरी करीत आहेत. बापू आपण नगरसेवक झाला, उपनगराध्यक्ष व्हाल, आपल्या हातून गावाचा सर्वांगीण विकास सर्व नगरपंचायत मधील सर्व नगरसेवकांना बरोबर घेवून कराल. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...!
बातमी
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक :
मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.