मा.श्री.डॉ.आजिनाथ रामहरी रूपनवर |
उपसंपादक (वैभव आठवले)
सोलापूर जिल्हा काँग्रेस (आय) या पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मा.श्री.डॉ.आजिनाथ रामहरी रूपनवर यांची निवड झाली आहे. तसेच एक सामाजिक कर्तव्य समजून गोविंद आयुर्वेद व पंचकर्म उपचार केंद्र म्हणून नातेपुते येथे दवाखाना चालवीत आहेत. डॉक्टर हे माजी विधानपरिषद आमदार मा.श्री.अॅड. रामहरी रूपनवर यांचे ते चिरंजीव आहेत. वडील आमदार झाले म्हणून कधीही गर्व बाळगला नाही, मीपणा केला नाही. उच्च शिक्षित असून जनतेशी नाळ जोडलेले असे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मनाचा मोठेपणा असलेले अभ्यासू विचारवंत म्हणून नाव आहे.
एकशिव या गावी
ग्रामीण भागात आश्रमशाळा, नातेपुते येथे श्रीराम दूध संघ,
आयटीआय कॉलेज, नातेपुते येथे रामहरी रूपनवर ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आहे.
या सर्व संस्थांवर डॉक्टर काम पाहत आहेत. त्यांची सोलापूर जिल्हा काँग्रेस आय पक्षाच्या
जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल
च्या नातेपुते कार्यालयात करण्यात आला. यावेळी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चे संपादक
प्रमोद शिंदे सर, प्रशांत खरात व त्यांचे सहकारी तसेच पत्रकार श्रीकांत बावीस्कर,
उमेश पोतदार, मनोज राऊत, विलास भोसले, हनुमंत माने,
अभिमन्यु आठवले व इ. पत्रकार व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत केला. त्यांच्या निवडीमुळे
त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे व त्यांना पुढील शुभेच्छा देण्यात आल्या.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक :
मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.