मा.श्री.अविनाशजी दोशी (संस्थापक) सन्मती सेवा दल व अहिंसा सेवा समिती |
उपसंपादक वैभव आठवले
नातेपुते ता.माळशिरस जि.सोलापूर येथील सन्मती सेवा दल व अहिंसा सेवा
समिती या सामाजिक संघटनेचे संस्थापक मा.श्री.अविनाशजी दोशी साहेब यांची नातेपुते
नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाली. त्यांचे आदर्शवादी सामाजिक कार्य म्हणजे
पुरोग्रस्तांना मदत, कोव्हिड-१९ कोरोना काळात
अन्नदान, रंजल्या गांजल्यांना मदत, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, शिंगणापुर येथील वानरांना टेम्पोने केळी
भरून जगण्यासाठी आधार दिला. विविध सामाजिक ठिकाणी CCTV
कॅमेरे, पानपोई
असे विविध उत्कृष्ट सामाजिक कामे करून ठसा उमटविला आहे. उच्च शिक्षित, व्यवसायधारक व दयाळूपणाची भूमिका
अशी आहे. सामाजिक क्षेत्रात योगदान अतिशय महत्वाचे आहे. ते अनेक पुरस्कारांनी सन्मानित
आहेत. काही वर्षापूर्वी नातेपुते ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे होते परंतु
त्यामध्ये अपयश आले. जनतेने दिलेल्या मताचा कौल स्वीकारून पराभव मान्य केला. खचून न
जाता आपले सामाजिक काम पुढे चालू ठेवले असा मोठेपणा असलेले अविनाशजी दोशी साहेब होय.
नातेपुते ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत
मध्ये झाल्याने निवडणुका लागल्या, निकाल लागले, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या निवडी झाल्या आणि
स्वीकृत नगरसेवक घेणेबाकी होते तेही पार पडले आणि सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
असल्यामुळे दोशी साहेब यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली. यामध्ये पॅनल
प्रमुख, नूतन नगरसेवक यांचाही प्रतिसाद मिळाला. एक आदर्श व्यक्तिमत्त्वाला
स्वीकृत नगरसेवक म्हणून नातेपुते नगरपंचायतमध्ये विराजमान होण्याची संधी मिळाली त्याबद्दल
त्यांचे सर्वस्थरातून अभिनंदन होत आहे. मा.अविनाशजी दोशी साहेब आपणास पुढील वाटचालीस
आठवले परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा...!
बातमी
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक :
मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.