उपसंपादक वैभव आठवले
नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील पोलिस स्टेशन
हद्दीतील मोटारसायकली चोरणार्या टोळीला अटक करून पोलिसांनी आदर्श कामगिरी केली
आहे व या टोळीला जेरबंद केले आहे. यामध्ये आदित्य रामभाऊ सकट (वय-२१), काशीनाथ दत्तात्रय लोखंडे (वय-१९) दोघे रा.विजयवाडी ता.माळशिरस यांना अटक
करून व विधी संघर्षग्रस्त बालक याला ताब्यात घेवून त्यांच्याकडून तपास करून चोरी
केलेल्या मोटारसायकली मध्ये बुलेट मोटारसायकल व इतर दोन बुलेट, फॅशन, स्प्लेंडर, ड्रीम युगा, प्लाटिना, एचएफ डिलक्स अशा मोटरसायकली चोरल्याचे
चोरट्यांनी सांगितले त्याची एकूण किंमत ६,२५,०००/- (सहा लाख पंचवीस हजार रुपये) असून सर्व मोटार सायकली जप्त करण्यात
आल्या. नातेपुते पोलिस स्टेशनकडे २ मार्च २०२२ रोजी गुन्हा दाखल झाला होता.
त्यानुसार तपासकामी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुंजे, नातेपुते पोलिस स्टेशनचे सपोनि मनोज सोलनकर यांच्या मार्गदर्शनाखाली
गुन्हे प्रकटीकारण शाखेचे अधिकारी व कर्मचारी तपास करीत असताना गोपनीय
बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यामुळे मांडवे गावातील पुणे-पंढरपूर रोड वर
अहिल्याचौक येथे दोन मुले संशयरित्या बुलेट मोटारसायकलवर फिरत असताना दिसली.
त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी सदर गुन्हा केला असल्याचा व इतर साथीदार विधी
संघर्षग्रस्त बालक याच्या मदतीने मोटारसायकली चोरल्याचे कबुल केले. या मोटारसायकली
नातेपुते शहर, अकलुज शहर, फलटण शहर, इंदापूर शहर, आटपाडी शहर,
माळशिरस शहर, खडकी पुणे शहर इ. गावातील आहेत. सदरची कामगिरी
पोलिस अधीक्षक सोलापूर तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक
हिम्मतराव जाधव, अकलुज उपविभागीय अधिकारी डॉ.बसवराज शिवपुंजे, नातेपुते पोलिस स्टेशनचे सपोनि मनोज सोलनकर यांच्या मार्गदर्शनाखाली
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे तानाजी पवार, पो.हे.का.राहुल रणनवरे, पो.ना.नवनाथ माने, पो.ना.मसाजी थोरात, पो.कॉ.मनसुर नदाफ, पो.ना.महेश पाटील, पो.कॉ.अजित कडाळे, पो. कॉ. गणेश कापसे, पो. कॉ. राजेंद्र सरगर इ. नी करून मोटारसायकली चोरणार्या चोरट्यांच्या
मुसक्या आवळल्या त्यामुळे जनतेतून नातेपुते पोलिसांचे कौतुक होत आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक :
मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.
✌️
ReplyDelete