रक्तदान शिबिरानिमित्त उपस्थित मान्यवर |
उपसंपादक (वैभव आठवले)
नातेपुते पालखी मैदान प्रभाग क्र.३ ता.माळशिरस, जि.सोलापूर येथे दि.०४/०२/२०२२ गणेश जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
केले होते. या कार्यक्रमानिमित्त मा.श्री.माधव खांडेकर साहेब (मुख्याधिकारी साहेब, नगरपंचायत नातेपुते) यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करणात आले. तसेच
माधव खांडेकर साहेबांचा माऊली नगर मित्र मंडळातर्फे विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी
नातेपुते नगरीतील नूतन नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला. तसेच कु.प्राची सुधीर उराडे
(MPSC) मध्ये यश संपादन केल्याबद्दल व कु.साक्षी सुधीर गोरे, ऋषिकेश विनायक वाघमारे शिष्यवृत्ती
परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी
साहेब मा.श्री.माधव खांडेकर साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले
की, रक्तदान शिबिरासारखे उपक्रम राबवले गेले पाहिजेत. माझी
वसुंधरा अंतर्गत पर्यावरण रक्षणासंबंधी माहिती दिली. तसेच तेथील नागरिकांना
ई-प्लेज शपथ देण्यात आली व माझी वसुंधरा अभियानाचे महत्व समजावून सांगितले. या अभियानामार्फत
स्वच्छता अभियान कार्यक्रम राबवले जातात. तसेच रक्तदान शिबिराचे चांगल्या प्रकारे नियोजन
केल्याबद्दल माऊली नगर मित्र मंडळाचे कौतुक केले. तसेच अतुल(बापू) पाटील (नूतन नगरसेवक, नगरपंचायत नातेपुते) यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी ते म्हणाले की, गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही तत्पर राहू. जनतेच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी
सर्वजण मिळून मिसळून एकजुटीने काम करू. रक्तदान शिबिरानिमित्त ९३ रक्तदात्यांनी रक्तदान
केले. यावेळी नातेपुते नगरीतील जेष्ठ मंडळी, सामाजिक, राजकीय, मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी समस्त पालखी मैदान येथील कार्यकर्त्यांचे मोलाचे
सहकार्य लाभले.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ.
अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण,
साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना
महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल,
जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.