अभिमन्यु बी.आठवले (संपादक साप्ताहिक बहुजन मित्र, साप्ताहिक बहुजन भूषण) (सोलापूर जिल्हा महाराष्ट्र पत्रकार संघ प्रमुख संघटक) |
महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष मा.विलासराव कोळेकर सर यांनी संपादक व निर्भिड पत्रकार म्हणून अभिमन्यु बी.आठवले यांना महाराष्ट्र ओळखतो. या महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा प्रमुख संघटकपदी आठवले यांची नियुक्ती करून पत्रकार संघ मजबूत करण्यासाठी जी जबाबदारी टाकली आहे ती पार पाडून महाराष्ट्र पत्रकार संघ सोलापूर जिल्ह्यातील तालुका कार्यकारणी, शहर कार्यकारणी मजबूत करणार असून पत्रकारांच्या असलेल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मा.श्री.विलासराव कोळेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र कार्यकरणी यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना बरोबर घेवून सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र पत्रकार संघ मजबूत करणार आहे. आठवले हे साप्ताहिक बहुजन भूषण व साप्ताहिक बहुजन मित्र या वृत्तपत्राचे संपादक व सडेतोड, बिनधास्त, रोखठोक, मवाळवादी तर कधी जहालवादी विचार मांडत असतात. त्यामध्ये परिवर्तन व प्रबोधनवादी विचार सामावलेले असतात. त्यांच्या लेखणीने अनेकांना घायाळ केले. तसेच ते “बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटनेचे संस्थापक आहेत. “वळवळ आणि चळवळ” ही त्यांच्या रक्तात भिनली आहे. शोध पत्रकारिता व जे दिसेल त्यावरती सडेतोड लिहीत आहेत. त्यांची सोलापूर जिल्हा प्रमुख संघटकपदी नियुक्ती करून जबाबदारी दिली आहे. त्या जबाबदारीला पात्र राहून महाराष्ट्र पत्रकार संघ सोलापूर जिल्ह्यात मजबूत करण्यावर भर देणार आहेत. पत्रकारांच्या व्यथा, वेदना यांची जाणीव असून त्यासाठी त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे. सध्या पत्रकार बांधव हा वंचित असून त्यांनाही शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. पत्रकारांवर समाजकंटकाकडून वारंवार हल्ले होतात त्यासाठी होणार्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी पत्रकारांचा संघ मजबूत एकसंघ असला पाहिजे त्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र पत्रकार संघ मजबूत करणार आहेत. जिल्ह्यातील, सर्व तालुक्यातील पत्रकार बांधवांना आवाहन करतो की, महाराष्ट्र पत्रकार संघ सोलापूर जिल्ह्यात मजबूत करण्यासाठी प्रवेश घ्यावा असे प्रसिद्धीद्वारे आठवले यांनी केले आहे. इतकेच.
टीप : या पत्रकार
संघात साप्ताहिक, मासिक, वार्षिक, पाक्षिक, दैनिक, न्यूज चॅनेल इ. संपादक पत्रकार यांना घेतले जाईल.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक :
मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.