मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेब (माजी कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य) |
संपादक
दि.२०/१२/२०२१ रोजी वार सोमवार या दिवशी ठीक सकाळी १०.००वा. अण्णाभाऊ साठे चौक, नातेपुते येथे राष्ट्रीय समाजपक्षाचे संस्थापक मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेब (माजी कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांची जाहीर सभा होत आहे. नातेपुते नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाजपक्षाने आपले पक्षातर्फे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाजपक्षाचे उमेदवार हे विजयी होऊन नातेपुते नगरपंचायतमध्ये प्रवेश करतील अशी अपेक्षा मतदारांमधून होत आहे. राष्ट्रीय समाजपक्षाने उमेदवार दिल्यामुळे जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे त्यामुळे मतदारांना हा पर्याय योग्य वाटत आहे. तसेच या राष्ट्रीय समाजपक्षाचे संस्थापक मा.महादेवरावजी जानकर साहेब हे निस्वार्थीपणे व जनतेच्या हितासाठी लढा देण्यासाठी व जनतेच्या हक्कासाठी लढणारे व्यक्तिमत्व आहे. ते एक अभ्यासू, तळागाळातील जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केलेले व्यक्तिमत्व म्हणजे मा.महादेवरावजी जानकर साहेब होय. स्वच्छ प्रतिमा असलेले, बहुजनसमाजप्रिय असेलेले लोकप्रिय नेते म्हणून जानकर साहेबांची ओळख आहे. नातेपुते नगरपंचायतमध्ये राष्ट्रीय समाजपक्षाने जे उमेदवार उभे केलेले आहेत ते प्रभागाच्या तसेच नातेपुते गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहतील तसेच शासनाच्या माध्यमातून नगरपंचायतसाठी जेवढ्या योजना आणता येतील व त्यासाठी लागणारा निधि जेवढा उपलब्ध होईल तेवढा निधि नातेपुते नगरपंचायतच्या विकासासाठी जानकर साहेब मंजूर करतील अशी अपेक्षा जनतेला आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली असून या पक्षाचे सर्व उमेदवार निवडून यावेत यासाठी राष्ट्रीय समाजपक्षाचे नेते यांनी घरोघरी जाऊन आपल्या उमेदवाराची ओळख व चिन्ह याची माहिती मतदारांना देवून जनजागृती केलेली आहे. तरी नातेपुते नगरपंचायत निवडणूक २०२१ च्या प्रचारानिमित्त मा.महादेवरावजी जानकर साहेब यांची जाहिर सभा होणार असल्यामुळे नातेपुते नगरीतील मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. सभा होणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य अप्लसंख्यांक आघाडी यांचे अध्यक्ष मा.श्री.शहीदभाई मुलाणी यांनी दिली
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.