मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेब (माजी कॅबिनेट मंत्री) |
संपादक
नातेपुते ता.माळशिरस येथील ग्रामपंचायतचे
नगरपंचायत मध्ये रूपांतर झाल्यामुळे व निवडणुका लागल्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे
या निवडणुकीत उमेदवार उभे करण्यासाठी जानकर साहेबांनी नातेपुते येथे कार्यकर्ते व मतदार
यांच्या गाठी घेवून तळागाळातील बहुजन समाजातील व्यक्तींना उमेदवारी देवून सन्मान केला.
उमेदवारांचे अर्ज दाखल होताच उमेदवारांच्या घरी जाऊन मा.श्री.माजी कॅबिनेट मंत्री महादेवरावजी
जानकर साहेब यांनी उमेदवारांच्या घरी जाऊन भेटी दिल्या व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
तसेच 15/12/2021 रोजी नातेपुते येथे प्रचाराचा शुभारंभ जानकर साहेबांच्या उपस्थितीत
उमेदवार उभे असलेल्या प्रभागात झंजावती दौरा करून लहान थोर यांना आदराने आपले पवित्र
मत माझ्या उमेदवारांना द्या. जानकर साहेब मतदारांच्या घरापर्यंत गेल्यामुळे नेता असावा
तर असा अशी चर्चा सर्व नातेपुते नगरीतील बांधव करीत आहेत. तसेच जानकर साहेबांना अध्यक्ष
शाहिद मुलाणी, श्रीकांत बावीस्कर व कार्यकर्ते यांनी सांगितले की,
बहुजन भूषणचे संपादक पत्रकार मा.श्री.अभिमन्यु आठवले हे आजारी पडले आहेत. त्वरित
जानकर साहेबांनी काही क्षणासाठी आपल्या प्रचारात बदल करून तातडीने बहुजन भूषणचे संपादक
अभिमन्यु आठवले यांची विचारपूस करण्यासाठी नातेपुते येथील कार्यालयात कार्यकर्त्यांचा
फौजफाटा घेवून विचारपूस करण्यासाठी आले व “लवकर बरे व्हा” असा सल्ला आठवले यांना
दिला. या सल्यामुळे त्यांच्या भेटीमुळे त्यांच्या येण्यामुळे,
स्पर्शामुळे मला ऊर्जा मिळाली. मी दवाखान्यात जावून उपचार घेणार होतो परंतु जानकर साहेबांच्या
भेटीमुळे माझ्यातील नकळत असलेले व हवामानामुळे आलेले आजारपण क्षणात निघून गेले. डॉक्टरांच्या
इलाजापेक्षा साहेबांनी दिलेली भेट माझे आजारपण घालवण्यासाठी मौल्यवान ठरले. साहेबांचा
जिव्हाळा, आपुलकी, मायाळूपणा, दयाळूपणा, माणुसकी ही बघून मी भारावलो असे जानकर साहेब
राष्ट्रपातळीवर एकमेव नेते ठरलेले आहेत की, प्रत्येकाच्या सुखादुखात,
गरीब असो श्रीमंत असो त्यासाठी झटत असतात. नातेपुते नगरीतील सर्व जागृत बांधवांनी आपले
पवित्र मत देताना योग्य उमेदवारांना मतदान करा. राष्ट्रीय समाजपक्षांनी या तालुक्यात
चांगली घौडदौड केली असून या तालुक्यात विधानसभेचा आमदार निवडून येवू शकतो यासाठी सर्व
या पक्षाचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन पक्षाची ध्येय उद्दिष्टे सांगत आहेत. असंख्य तळागाळातील
कार्यकर्ते या पक्षात सामील होत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व कार्यकर्ते जिवाभावाचे
आहेत. असे जिवाभावाचे कार्यकर्ते इतर कोणत्याही पक्षात नाहीत. राष्ट्रीय समाजपक्षाने
उमेदवारी देताना पैशावाला, घमेंडखोर व्यक्तींना उमेदवारी न देता तळागाळातील
बहुजन समाजातील व्यक्तींना उमेदवारी देवून आदर्श निर्माण केला आहे त्यांना मानसन्मान
दिला आहे असे म्हटले तर त्यामध्ये काहीही गैर नाही. जानकर साहेब व त्यांचे कार्यकर्ते
दिलेला शब्द पाळणारे आहेत त्यामुळे ते खरे लोकशाही जपत आहेत. मतदारांनी मत देताना उमेदवारांची
पारख करून उमेदवारांना निवडून द्या. तुमच्या मताची मतदार राजांनी मताची किंमत पैशात
मोजू नये. राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व उमेदवार माणुसकी जपणारे आहेत. विकास करणारे
आहेत. हे मतदार राजांनी लक्षात घ्यावे. त्याचप्रमाणे इतरांना राष्ट्रीय समाज पक्षाने
उमेदवारी देताना पत्रकारांच्या कुटुंबात माजी कॅबिनेट मंत्री मा.महादेवरावजी जानकर
साहेबांनी उमेदवारी देवून पत्रकाराचा मानसन्मान केला हा आदर्श म्हणावा लागेल.
संपादक पत्रकार श्रीकांत बावीस्कर हे राष्ट्रपती
पुरस्कार प्राप्त असून ते वीज वितरण कंपनी आयोगाचे सदस्य आहेत आणि त्यांच्याच पत्नी
सौ.सीमा श्रीकांत बावीस्कर यांना उमेदवारी देवून राष्ट्रीय समाज पक्षाने सन्मानित केले
आहे हा एक आदर्श आहे. इतकेच
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल,
जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.