मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेब
(माजी कॅबिनेट मंत्री)
संपादक
नातेपुते ता.माळशिरस,
जि. सोलापूर येथील ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाल्यामुळे व निवडणूक लागल्यामुळे
संस्थापक माजी मंत्री मा.महादेवरावजी जानकर साहेब त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या
माध्यमातून सहा उमेदवार विविध प्रभागात निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. राष्ट्रीय समाज
पक्षाने सर्व धर्म समभाव असे उमेदवार दिल्यामुळे मतदारामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण
झाले आहे. तसेच दिनांक ०७/१२/२०२१ व १२/१२/२०२१ रोजी संस्थापक माजी मंत्री मा.महादेवरावजी
जानकर साहेबांनी नातेपुते नगरपंचायत निवडणूक लढवणार्या उमेदवारांच्या घरी जाऊन शुभेच्छा
दिल्या आहेत. मन मोठे असलेला एक आदर्श नेता म्हणजे महादेवरावजी जानकर साहेब आहेत. आमदार
नामदार झाले परंतु पाय जमिनीवर ठेवून कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे
उभे राहत आहेत. तसेच या पक्षातील कार्यकर्ते सुद्धा मनमिळाऊ आहेत. प्रत्येकांचा आदर
करतात. साहेब लहान असो वा मोठा त्यांचा आदर करतात. मी संपादक म्हणून साहेबांकडे पाहिले,
अनुभवले. “नेता असावा तर महादेवरावजी जानकर साहेबांसारखा”. मी उदंड नेते इतर पक्षातील
पाहिले आहेत परंतु त्यांना कार्यकर्त्यांची कदर नाही. परंतु जानकर साहेबांसारखा नेता
कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारतात. “जनता हाच माझा पक्ष” ही जानकर साहेबांची भूमिका
असावी असे वाटते. साधी राहणी, उच्च विचार सरणी अभ्यासू व्यक्तिमत्त्व समाजसेवेची
प्रचंड आवड, विविध भाषेवरती प्रभाव, मनमिळाऊ स्वभाव यामुळे साहेबांकडे पाहिले
जाते. जनतेचा सेवक समजून साहेब काम करतात. राष्ट्रीय समाज पक्षाची घौडदौड जोमाने सुरू
आहे. माझा कार्यकर्ता स्थानिक स्वराज्य संस्थेकडून पदाधिकारी झाला पाहिजे. आमदार खासदार
झाले पाहिजेत ही तळमळ आहे. दिलदार असे व्यक्तिमत्व, झोपडीपर्यंत जाऊन विचारपूस करणारा नेता म्हणजे
मा.महादेवरावजी जानकर साहेब होय. नातेपुते नगरपंचायतमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार
निवडणूक रिंगणात उभे असून मतदारांची सुद्धा या उमेदवारांना सुद्धा पसंती आहे असे मतदारराजाकडून
ऐकायला मिळत आहे. नातेपुते येथे उमेदवारांना भेटीदेण्यासाठी साहेब आले त्यावेळी असंख्य
त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. ते पुढील प्रमाणे प्रभारी म्हणून श्री.रामदास शेलार
सर (RSP, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य),
श्री.शाहिदभाई मुलाणी, (पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष)
श्री.रणजीत सुळ (सोलापूर जिल्हाध्यक्ष), श्री.माऊली सरक (सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष),
श्री. काशीनाथ नाथा शेवते (राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य),
श्री.माऊली नाथा सरगर (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष), श्री. अजितदादा पाटील (पश्चिम महाराष्ट्र
युवक अध्यक्ष), श्री.खंडेराव सरक (सातारा जिल्हाध्यक्ष),
श्री.संजय वलेकर सर (प्रवक्ता रासप),
श्री.अमरजीत जानकर (नातेपुते शहर अध्यक्ष), श्री.रियाजभाई आतार (सोलापूर जिल्हाध्यक्ष
अल्पसंख्याक) तसेच ब्रम्हदेव बर्वे, श्रीकांत बावीस्कर,
बिपिन सातपुते, शिंगम बरगडे, विशाल सोरटे,
शेखर अटक, वैजिनाथ पालवे (तालुका अध्यक्ष),
बापूराव जानकर, सनी बावीस्कर, शंकर जानकर,
नामदेव टकले, मेटकरी, रवी बरगडे, गणेश सुळ, सागर मदने व सर्व उमेदवार यावेळी उपस्थित
होते.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच
वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.