संपादक
गेल्या दोन वर्षापासून ६ डिसेंबर हा दिवस
महापरिनिर्वाण अभिवादन दिन बाबांचा असतो. तर १ जानेवारी भीमाकोरेगाव विजयस्तंभ अभिवादन
दिवस असतो. तर बाबांचा जन्म दिवस १४ एप्रिल असतो. या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी
व बाबांची जयंती साजरी करण्यासाठी भीम सैनिकांच्या आनंदाला उधाण येत असते. तो सण समजला
जात असतो. प्रत्येक वर्षी सरकार ह्या कार्यक्रमांना रोगाच्या आपत्तीचे कारण पुढे करून
भीम सैनिकांना घरातूनच अभिवादन, जयंती उत्सव साजरे करायला
सांगते. भीम सैनिकांनी आपले शक्ति प्रदर्शन दावू नये, बाबांविषयी
असलेली श्रद्धा व दैवत आहे. यावरती सरकार रोगाचे निमित्त करून नियम दाखविले जाते आहे.
राजकर्त्यांनो तुमचे मेळावे होतात, तुमचे सण साजरे होतात, निवडणुका घेता, मंदिरे उघडली गेली, नाट्यगृह, तमाशा, नाटक, शाळा, हॉटेल इ. सुरू केले यावरती का बंधने घातली जात
नाहीत.
६ डिसेंबर, १ जानेवारी, १४ एप्रिल आले की भीम सैंनिकांना रोकण्याचे
काम सरकार करत आहे. भीम सैनिक कायद्याचा मान सन्मान ठेवूनच असतात. सरकारच्या आदेशाची
गरज भीम सैनिकांना कधीच नसते. ह्या कार्यक्रमांनाच सरकार रोकण्याचे काम करीत आहे, हे एक षड्यंत्र आहे असे संपादक व संघटनेचा संस्थापक म्हणून वाटते. “भीम
सैनिक अन्याय करणारे नाहीत आणि अन्याय सहन करणारे ही नाहीत हे सरकारने लक्षात घ्यावे”.
अभिवादन दिवस व जयंती दिवस आमच्या श्रद्धेचे, जिव्हाळ्याचे असतात.
सतत या कार्यक्रमांना रोकण्यासाठी सरकार रोगाचे निमित्त पुढे करून भीम सैनिकांना बाहेर
पडू देत नाही. भीम सैनिकांना कायद्यानुसार कसे वागावे हे कळते. सरकारने शिकवण्याची
गरज नाही. त्याचे तंतोतंत पालन भीम सैनिक करतात. आमच्या या कार्यक्रमांना बंदी घालण्याचे
सरकार काम करीत आहे हा मी तर “बहिष्कार” समजतो. हा तमाम भीम सैनिकांचा अपमान
आहे असे माझे ठाम मत आहे. आमच्याच या कार्यक्रमावेळी, उत्सवावेळी
रोगाची आपत्ती कशी काय येते? भीम सैनिकांनो बस्स झाले आता सरकारचे
आदेश, बिनदास्त ६ डिसेंबर अभिवादन दिवस, भीमकोरेगाव विजयस्तंभ अभिवादन दिवस व १४ एप्रिल बाबांची जयंती धूमधडाक्यात
साजरी करा. आपण भीम सैनिक संविधानानुसारच वागणारे कार्यकर्ते आहोत. सतत आमच्याच कार्यक्रमावेळी
सरकारला “विटाळ” का होतो? हेच समजत नाही. भीम सैनिकांनो
आपल्या ताकतीची सरकारला भीती वाटत आहे यामुळे सरकार रोगाला पुढे करीत आहेत असे वाटते.
परंतु रोगच काय पण रणंगणात उतरल्यावर लढण्यासाठी भीम सैनिक स्वत:चा, कुटुंबाचा, कोणाचाही विचार करीत नसतात असे बहादुर भीम
सैनिक लढाऊ आहेत, भित्रे नाहीत हे सरकारने ध्यानात घ्यावेत. आम्हाला
आमचे अभिवादन दिवस व जयंती दिवस आमच्यासाठी प्रेरणा व स्फूर्ती असे असतात. गेले ते
दिवस, राहिल्या त्या आठवणी, खूप सहन केले
अन्याय-अत्याचार, वेदना, छळ यापुढे भीम
सैनिकांनो आपले अभिवादन दिवस व जयंती दिवस मोठ्या प्रमाणात साजरे करूया. त्याचप्रमाणे
यापुढे गाफिल भीम सैनिकांनी राहू नये. “झेंडा लहान पण दांडा मोठा” अशी भूमिका
भीमसैनिकांनी ठेवावी. आम्ही आमच्या अभिवादन दिवसानिमित्त व जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात
आम्ही एकत्रित येऊ नये असे सरकारचे कटकारस्थान असावे असे वाटते. सगळे मोकळे आणि आमच्याच
उत्सवावेळी रोगाची लागण कशी होते? याच वेळेस कसा काय रोग येतो? हे समाजकंटकाने व जातिवादी राजकर्त्यांनी रचलेला डाव आहे असे वाटते. काहीही
झाले तरी भीम सैनिकांनो सरकारच्या दबावाला बळी पडू नका. रोगाला आळा बसविणारे आपण भीम
सैनिक आहोत. जे बाबांनी संविधानात आपत्ती काळात जे नियम घालून दिले आहेत त्याचे पालन
करणारे आपण आहोत. भीम सैनिकांची ताकत दिसणार असल्यामुळे सरकारच्या पायाखालची वाळू सरकत
आहे त्यामुळे या दिवसात रोगाची आपत्ती हे कारण पुढे करून आपणास एकत्रित येण्यापासून
बंधने घालीत आहे हे मात्र सत्य आहे त्यामुळे बिनदास्त अभिवादन दिवस व जयंती उत्सव मोठ्या
प्रमाणात साजरे करा. जय भीम
जनहितार्थ
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार