मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेब (माजी कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य) |
संपादक
नातेपुते ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाल्यामुळे व सार्वत्रिक निवडणुका २०२१-२२ या कालावधीमध्ये लागल्यामुळे व प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेब यांची जाहीर सभा २०/१२/२०२१ रोजी संपन्न झाली. मतदार राजामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मतदारांनी आपले पवित्र मत राष्ट्रीय समाजपक्षाचे व महाराष्ट्र विकास आघाडीचे समाजभूषण पॅनेलच्या उमेदवारांना दिले पाहिजे अशी मानसिकता मतदार राजांची झाली आहे. ही सभा अण्णाभाऊ साठे चौक, नातेपुते येथे संपन्न झाली. यावेळी प्रचंड महिला व पुरुष मतदार उपस्थित होते. डोक्यावरती उन्हाचा तडका बसत असतानाही जानकर साहेबांची सभा ऐकण्यासाठी जागृत मतदार प्रचंड प्रमाणात उपस्थित होते. जानकर साहेबांनी जनतेला आवाहन केले की, रात्र वैर्याची आहे जागे रहा, आमिषाला बळी पडू नका, जो कोणी उमेदवाराला, मतदाराला धमकी देईल त्या धमकीला धमकीनेच उत्तर दिले जाईल. मतदार राजाने आपले पवित्र मत राष्ट्रीय समाजपक्ष महाराष्ट्र विकास आघाडी या समाजभूषण पॅनेल च्या उमेदवाराला मते देवून प्रचंड मतांनी निवडून देवून विजयी करावे व नातेपुते नगरपंचायतमध्ये सेवा करण्याची उमेदवारांना संधी द्यावी. उमेदवारांना व मतदारांना कोणी धमकावले तर त्यास जसेच्या तसे उत्तर देवू असे जानकर साहेब म्हणाले. मतदारांचे मत परिवर्तन घडवणारे आहे. तुम्ही उमेदवार निवडून द्या, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. विकासासाठी कटिबद्ध आहोत. विकासासाठी जेवढा निधी आणता येईल तेवढा निधी उपलब्ध करून देईन. एमआयडिसीसाठी प्रयत्नशील राहू. बायपास रोड बाबत दखल घेऊ. जेवढे मला करता येईल तेवढे माझी तयारी आहे. तसेच जानकर साहेब म्हणाले मी लग्न केले नाही, मला संसार नाही, माझी जनता हेच माझे कुटुंब आहे. ही निवडणूक श्रीमंत विरुद्ध गरीब उमेदवार अशी आहे. पैसे घेवून पवित्र मत विकू नका. सर्व उमेदवार हे जिवाभावाचे आहेत, उच्चशिक्षित आहेत, कर्तव्यात कसूर न करणारे आहेत. प्रभागाचा तसेच संपूर्ण नातेपुते गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील असलेले उमेदवार आहेत. नातेपुते हे विकासाचे मॉडेल करण्यासाठी मी यापुढे सदैव दक्ष राहील. तसेच जेवढ्या विकासाच्या योजना नातेपुते गावासाठी आणता येतील त्यासाठी माझा प्रयत्न राहील. मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेबांच्या जाहीर सभेमुळे त्यांच्या भाषणामुळे मतदारराजांना उभारी व आधार वाटू लागला आहे. मतदारांचा कौल महाराष्ट्र विकास आघाडी, राष्ट्रीय समाजपक्ष युतीचे समाजभूषण पॅनेल च्या उमेदवारांना मत देवून नातेपुते नगरपंचायतमध्ये पाठवा असे आवाहन मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेब संस्थापक राष्ट्रीय समाजपक्ष व माजी कॅबिनेट मंत्री यांनी मतदारांना केले. यावेळी अनेक नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व उमेदवार, रासपचे पदाधिकारी, विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते, मतदार मोठ्या प्रमाणात हजर होते.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल,
जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.