मा.श्री. आमदार निलेश लंके साहेब (आमदार पारनेर-नगर विधानसभा) |
संपादक
पारनेर चे लोकप्रिय राष्ट्रवादी पक्षाचे आमदार कोरोना कोव्हिड-१९ या रोगाच्या संकटावेळी खासदार शरद पवार यांच्या नावाने कोव्हिड सेंटर उभे करून गोरगरीब जनतेला आधार देणारे असे आमदार निलेश लंके साहेब दिनदुबळ्या जनतेसाठी “दयावान” ठरले आहेत. साधी राहणी, उच्च विचारसरणी, जनतेच्या हाकेला धावून जाणारे त्यांच्यावर कोसळलेले संकट त्या संकटापासून बाहेर काढणारे आदर्श व्यक्तिमत्व ठरले आहेत त्यांच्या या सेवाभावी कामगिरीमुळे ते “दयावान” ठरत आहेत. आजपर्यंत असंख्य आमदार झाले परंतु असा आमदार ना मागे कधी बघितला नाही आणि पुढे असे होतील असे वाटत नाही. कोरोना कोव्हिड-१९ या रोगाची आपत्ती म्हणजे मृत्युचे संकट समजले जात आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे भारत देशातील जनता त्या या कामगिरीवर आनंदी आहे. या आमदारासारखे कोणतेही आमदार खासदाराचे काम नाही. “मानवतेचा झरा म्हणजे आमदार निलेश लंके साहेब" आहेत. त्यांच्यापुढे माणुसकी ही जातच माणसाला आधार देते हे दाखवण्याचे पुण्याईचे काम साहेब करीत आहेत. लाहनापासून थोरापर्यंत ते वयोवृद्धापर्यंत आपला वाटणारा आमदार म्हणजे निलेश लंके साहेब आहे. जे आमदार खासदार मंत्री होतात ते फक्त स्वत:चे हित पाहत आहेत. दुसर्याला देण्याचे त्यांची मनोवृत्ती नाही परंतु दुसर्याचे हित पाहणारे, आलेले संकट घालवणारे, त्यांना “जिवदान” देणारे एकमेव “दानशूर” आमदार म्हणजे लंके साहेब आहेत. या भयानक आपत्तीच्या काळात माता-भगिनी, बांधव यांच्यासोबत राहून रात्रंदिवस सेवा बजावत आहेत. “जनसेवा हीच ईश्वर सेवा” समजून काम करीत आहेत. त्याची कामगिरी इतिहास घडविणारी ठरत आहे. दुसर्याचे दु:ख हे माझ्या कुटुंबातील दू:ख, वेदना, काळजी समजून देखभाल करीत आहेत. माणसातील माणूस पाहणारे असे आमदार आहेत. त्यांच्या या कामाची देशाबाहेर किर्ति पसरली आहे. लंके साहेब हे गुणवंत, नामवंत, यशवंत, कीर्तीवंत असे ठरले आहेत. कोरोना कोव्हिड-१९ या रोगाची आपत्ती म्हणजे जगाचा निरोप घेण्याची आपत्ती या आपत्तीत घरदार, आमदारकीचा तोरा, घमेंड न बाळगता कोव्हिड सेंटर उभे करून हजारो लोकांना धीर देवून औषध उपचार करून त्यांच्या राहण्याची जेवणाची तसेच मनोरंजनाची सोय करून कोरोना रोगाला पळवून लावून असंख्य व्यक्तींना या रोगापासून मुक्त केले आहे. त्यांना जगण्याचा अधिकार दिला आहे. आमदार निलेश लंके साहेब यांचे कार्य महान आहे त्यांच्या कार्याचे मोजमाप करण्यासाठी यापुढे “मोजपट्टी” निघणार नाही एवढे कार्य श्रेष्ठ आहे. कर्तव्य समजून जनसेवा करीत आहेत. मा.श्री आमदार निलेश लंके साहेब तुमच्या कार्याचा आमच्या आठवले परिवाराला सार्थ अभिमान आहे. तुमचा कर्तव्यदक्षपणा दिनदुबळ्याचे अश्रु पुसणारे एक दिलदार सर्वगुण संपन्न असे खंबीर नेतृत्त्व ही ओळख निर्माण केली तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला उदंड आयुष्य लाभो. तुमची कामगिरी आदर्शवादी कामगिरी ठरत आहे. आमदार निलेश लंके साहेबांसारखा यापुढे असा आमदार होणे नाही असे वाटते इतकेच.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.