संपादक
गेल्या वर्षभरापासून कोरोना कोव्हिड-१९ या रोगाने हाहाकार उडवलेला आहे, जगणे अवघड झाले आहे, फिरणे अवघड झाले आहे अशा या महाभयंकर संकटातून समाजप्रबोधनासाठी समाजबांधवांना घडणाऱ्या घटनांची माहिती पुरवण्यासाठी पत्रकार जीवाची पर्वा न करता बातम्यांसाठी धडपडीत असतात. या रोगाचे संकट स्वतःवर व कुटुंबावर आघात करू शकते पण त्याची भीती न बाळगता धोका पत्करून आमचे पत्रकार बांधव मोठ्या हिमतीने बातमीतून प्रसार व जागरूकता यासाठी अहोरात्र झटतात मग तो पत्रकार चॅनेलचा, दैनिकाचा, साप्ताहिक, मासिक, पाक्षिक इ. कोणत्याही मीडियाचा असुद्या त्यांची तळमळ ही जनतेला सावधगिरी बाळगण्यासाठी व सावधान होण्यासाठी पत्रकार आपली भूमिका पार पाडीत आहेत. पत्रकार हे जनतेचे खरे मित्र आहेत. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी दिवसरात्र आपले कर्तव्य पार पाडीत आहेत. पत्रकारांना बातमीसाठी जात असताना पोलिसांकडून मानहानी व अपमान सहन करावा लागतो हे चिंताजनक बाब आहे. मला बातमीसाठी जात असताना आलेला अनुभव आहे. पत्रकाराचे काम म्हणजे ज्या घटना घडतात त्या उजेडात आणणे व जनतेला वाचावयास देणे असे असते. या आपत्ती काळात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पत्रकार, पोलिस, कामगार हे महत्वाचे मानले जातात. आपत्ती काळात अधिकारी हे मुकदमाची भूमिका बजावतात. पत्रकारांसाठी शासनाने आर्थिक मदत केली पाहिजे. पण पत्रकार वगळून जे दानशूर बांधव आहेत ते दानशूरपणा दाखवतात हे संपादक या नात्याने बरे वाटत नाही. दानशूरपणा दुसऱ्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी पत्रकार यामुळे दानशूर बांधवानी पत्रकारांनाही मदत करून दानशूरपणा दाखवावा. सर्वच पत्रकार हे श्रीमंत नाहीत हे लक्षात घ्यावे. पत्रकारांना पत्रकारिता करीत असताना दानशूरांनी त्यांचाही विचार करावा असे वाटते.
जनहितार्थ
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार