संपादक
कोरोना कोव्हिड-१९ या रोगाच्या काळात शासनाने जनतेच्या हितासाठी
धान्य वाटप करून जनता जगवण्याचा प्रयत्न करीत असताना त्या रेशन दुकानदारांना मोजक्या
तोतया समाजकंटकाकडून रेशन दुकानदारांना “टार्गेट” करून पैसे उकळण्याचा काही
समाजकंटकाचा धंदा आहे. समाजकंटक रेशन दुकानदारांना मानसिक त्रास देवून पैसे काढतात.
वरिष्ठ अधिकारी कार्यालयाकडे पैसे काढण्याच्या हेतूने काहीतरी पत्र व्यवहार करून त्या
पत्राच्या आधारे रेशन दुकानदारांना भीती दाखवून पैसे व रेशनचा धान्यपुरवठा हे समाजकंटक घेऊन जात आहेत. रेशन दुकानातील कागदपत्रे
तपासायला आलो आहे व वरिष्ठ कार्यालयाने माझी नेमणूक केली आहे असे म्हणून प्रचंड नाहक
त्रास समाजकंटक “ब्लॅकमेल” करून पैसे व धान्य पुरवठा घेऊन जात आहेत. माळशिरस
तालुक्यातील रेशन दुकानदार हैराण झाले आहेत. ब्लॅकमेल करणारा आहे तो दहा हजार ते वीस
हजार अशी मागणी प्रत्येक रेशन दुकानदारांना करीत आहेत. तसेच काही व्यक्तींनी धर्मादाय
आयुक्त कार्यालयाकडून संस्था काढून त्या संस्थेच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून पैसे
उकळण्याचा धंदा चालू केला आहे. रेशन दुकानदारांनी जो कोणी त्रास देत असेल, ब्लॅकमेल करीत असल्यास त्याचे नाव, पत्ता घेण्यात यावा व कशाप्रकारे
ते रेशन दुकानात येऊन ब्लॅकमेल करून पैसे मागतो त्याचे व्हिडिओ चित्रिकरण करावे. त्याच्या विरोधात रेशन दुकानदारांनी
न भीती बाळगता जवळच्या पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करावा. त्याचप्रमाणे ब्लॅकमेल
करून पैसे मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे त्या समाजकंटकाची तक्रार करावी. संस्था काढून त्या संस्थेच्या
आधारे त्रास देत असल्यास त्या व्यक्तीची संस्था बरखास्त करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे
पत्रव्यवहार करावा. रेशन दुकानदारांनी प्रामाणिकपणे गोर गरिबांसाठी आलेला धान्य पुरवठा
वितरित करावा जेणेकरून त्यांना आधार मिळेल. तसेच आपण तक्रार केल्यास त्याची प्रत संपादक
यांच्याकडे आणून देण्यात यावी. त्या तोतियांकडून पैसे उकळण्याचा धंदा चालू आहे व रेशन
दुकानदारांना त्रास देत असल्यास त्याचा पर्दाफाश करू. जे समजले, ऐकले, कानावर आले त्या आधारे सडेतोड लेखणीद्वारे
समाजप्रबोधन व्हावे यासाठी जागरूकता दाखवावी यासाठी प्रसिद्धी करण्यात आली आहे. मी
आपल्या वरील होत असलेल्या अन्यायविरुद्ध लढण्यासाठी सज्ज आहे.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन
भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसले, जे पाहिले, जे अनुभवले तेच लिहणे हेच वृत्तपत्राचे
ध्येय उद्दीष्ट आहे.