संपादक
कोरोना
कोव्हिड-१९ या रोगाची आपत्ती जनतेला वेदना देण्यासाठी तसेच जगाचा निरोप घेण्यासाठी
मारक ठरत आहे. या रोगावरती सरकार जनतेला वाचवण्यासाठी विविध कंपनीचे इंजेकशन देण्याचा
जो सपाटा लावलेला आहे तो चांगला व आनंदाची बाब आहे. परंतु या इंजेकशनाचे फायदे काय
आहेत हे इंजेकशन माणसाच्या शरीरात असलेल्या किती रोगावर प्रभावित आहे जेणेकरून त्या
माणसाच्या शरीरातील रोग आहेत ते नष्ट होतील. तसेच या इंजेकशनचा परिणाम होईल का?
यासाठी माणसाच्या शरीरात असलेले असंख्य रोग त्या रोगावर सध्या दिले जाणारे इंजेकशन
काय परिणाम करेल का? शरीरातील कोणकोणत्या आजारावर हे इंजेकशन उपयोगी पडू
शकते त्या आजारांची नावे कंपनी व सरकारने देणे मला संपादक म्हणून योग्य वाटते. केवळ
कोरोना कोव्हिड-१९ ही आपत्ती समजून ह्या इंजेकशन चे फायदे तोटे न बघता जनतेला माहिती
न देता जनतेला देणे हे योग्य नाही असे माझे ठाम मत आहे. एकतर या देशातील जनता “माकड”
झाली आहे. राज्यकर्त्यांनी थाळी वाजवा, घरे पेटवा, आत्महत्या करा, अन्न-अन्न करून मरा असे जरी
आदेश काढले तरी भोळीभाबळी जनता त्या राज्यकर्त्याच्या आदेशाची तंतोतंत पालन करेल यामध्ये
शंका नाही एवढी आंधळी जनता झाली आहे. दिले जाणारे इंजेकशन वयोमार्यादा कमी करण्यासाठी
की वयोमार्यादा वाढवण्यासाठी आहे हे सरकारने जनतेला सांगितले पाहिजे. हुशार राज्यकर्ते
आणि आंधळी जनता हे या देशाचे दुर्भाग्य म्हणावे वाटते. हे कोरोना या रोगावर इंजेकशन
देताना जनतेला या इंजेकशनचे फायदे तोटे सांगून प्रथम जनजागृती करणे हिताचे आहे. सध्या
हे इंजेकशन घेण्यासाठी असंख्य व्यक्ति पुढे येत नाहीत ते इंजेकशन ची भीती बाळगत आहेत
आणि ते खरे ही आहे. हे इंजेकशन केवळ कोरोना हा रोग शरीरातून घालवण्यासाठी आहे असे चित्र
आहे परंतु ज्या व्यक्ति अनेक शारीरिक रोगामुळे त्रस्त आहेत. वेदनेने घायाळ आहेत त्या
रोगावर हे इंजेकशन परिणाम करेल का? असंख्य व्यक्तींना रोगराईने घायाळ केले आहे त्यामुळे
सरकारने कोरोना कोव्हिड-१९ या काळात इंजेकशन देण्याची मोहीम राबवली आहे त्या इंजेकशनचे
फायदे तोटे जनतेसमोर मांडले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीचा रक्तगट हा सारखा नाही त्यामुळे
हे इंजेकशन घेतले तर “जीवदान” मिळेल का? या इंजेकशनामुळे मृत्यू होईल का?
यामध्ये जनता विचाराधीन आहे. या इंजेकशनचे फायदे तोटे सरकारने जनतेला सांगावेत. सरकार
इंजेकशन घ्या म्हणून घेत राहणे ते जिवावर बेतू शकते असेही माझे मत आहे. इंजेकशनचे महत्व
जनतेला समजले पाहिजे. जर हे इंजेकशन घेतले आणि तो व्यक्ति “मरण” पावला तर
याला जबाबदार कोण? खुनाचा गुन्हा कोणावर दाखल केला पाहिजे हे सरकारने
जनतेला सांगितले पाहिजे. या इंजेकशनचे ध्येय उद्दिष्टे जनतेला समजली पाहिजेत. या देशावर
राज्यकर्त्यांनी जनतेला खेळणी माकड बनवले आहे त्यामुळे “डोळस जनता आंधळी झाली आहे”.
जनता या इंजेकशनला भीत असल्यामुळे त्याचे फायदे तोटे सरकारने सांगणे हे कर्तव्य आहे
इतकेच.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.
श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना
महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे
ध्येय उद्दीष्ट आहे.