Skip to main content

Posts

नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

आयडीबीआय बँक नातेपुते शाखा मॅनेजर यांचे विरोधात गणेश मल्हारी घुले यांचे उपोषण

उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील गणेश मल्हारी घुले यांनी 26/01/2023 पासून आयडीबीआय बँक शाखा नातेपुते मॅनेजर विरोधात उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आजचा 5 वा दिवस आहे. उपोषण सोडण्यासाठी माझ्यावर दबाव आणत आहेत असे म्हणाले. तसेच बँक मॅनेजर यांनी 10 ते 11 महीने कर्ज प्रकरण मंजूर करण्यास वेळ लावला, माझी दिशाभूल केलेली आहे. मी खादी ग्रामोद्योग महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्याकडे 25 लाख रुपये व्यवसाय कर्जासाठी अर्ज दिला होता. त्यासाठी ट्रेनिंग हे केले व प्रकरण मंजूर ही झाले, ते प्रकरण नातेपुते आयडीबीआय बँक शाखा नातेपुते यांच्याकडे पाठविले. माझ्या प्रकरणाची दखल घेतली नाही, दिशाभूल केली, दफ्तर दिरंगाई कायद्याचा अवमान केला गेला यामुळे मानसिक त्रास झाला आहे. वेळ व जाण्यायेण्यासाठी पैसाही खर्च झाला आहे. कर्ज प्रकरण त्वरित मंजूर व्हावे यासाठी 11/11/2021 रोजी मुंबई मंत्रालय येथे समक्ष जावून मुख्यमंत्री कार्यालयात माझी व्यथा वेदना मांडली व प्रकरण मंजूर करण्यात यावे असे मी दिलेल्या अर्जावर नमूद केले व मुख्यमंत्री कार्यालयातून मेसेज ही आला परंतु दखल घेतली नाही. बँकेत...

भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता

उपसंपादक साप्ताहिक बहुजन भूषण           भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे केवळ घटनेचे शिल्पकार व दलितांचे नेते म्हणून पाहिले जाते पण ते एक संपादक पत्रकार होते. बाबासाहेबांनी 24 नोव्हेंबर 1930 साली जनता नावाचे वृत्तपत्र सुरू केले, ते पाक्षिक होते नंतर ते साप्ताहिक केले. तसेच वृत्तपत्र हे आधुनिक युगाचे, प्रगतीचे, लोकशिक्षणाचे चांगले माध्यम असल्याने त्याद्वारे अश्पृशांच्या हक्काची मागणी मांडता येईल यादृष्टीने बाबांनी 31 जानेवारी 1920 रोजी मुकनायक हे वृत्तपत्र सुरू केले त्यास 103 वर्षे पूर्ण होत आहेत.       तसेच अश्पृशांची चळवळ भक्कम करण्यासाठी आपले वृत्तपत्र असल्याशिवाय पर्याय नाही असे बाबांना वाटू लागले. त्यामुळे 03 एप्रिल 1927 रोजी "बहिष्कृत भारत" हे वृत्तपत्र सुरू केले. 31 जानेवारी 2023 रोजी मुकनायक वृत्तपत्राच्या वर्धापनदिनाला कोटी कोटी शुभेच्छा...!  या वर्धापन दीनानिमित्त शासकीय, निमशासकीय, समाजाने या मुकनायक वृत्तपत्राच्या 103 व्या दिनानिमित्त आपआपल्यापरीने कार्यक्रम घेवून वर्धापनदिन साजरा करावा.  जनहिता...

ग्रामपंचायतच्या मासिक मिटिंगला,सभांना ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचा अधिकार- मा.श्री.डॉ.अभिमन्यु. बी. आठवले

उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंगला सर्व सामान्य ग्रामस्थांना बसता यावे यासाठी अनेक युवकांनी आपआपल्या परीने ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. ग्रामविकास विभागाच्या अधिकारी यांनी आता ग्रामस्थांना मासिक मीटिंगला, सभांना बसण्याचा अधिकार आहे असे कळविले आहे. ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक आता कोणीही अडथळा करू शकणार नाहीत. याबाबत राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना कळविण्यात आले आहे त्यामुळे हा आदेश राज्यातील सर्व ग्रामपंचायतना लागू झाला आहे. या मासिक मीटिंगला, सभेला यापुढे ग्रामस्थांना हजर राहण्याचा अधिकार आहे. सहभागातून यापुढे ग्रामपंचायतचा कारभार अधिक पारदर्शी व्हावा म्हणून यापूर्वीही राज्य शासनाने 19 सप्टेंबर 1978 रोजी शासकीय परिपत्रक काढले होते. परंतु या मासिक मीटिंगला, सभांना ग्रामस्थ यांनी हजर राहू नये या दृष्टीने ग्रामपंचायतने एकमताने ठराव करून सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक या व्यक्तिरिक्त इतर ग्रामस्थांना त्यामध्ये सहभाग घेवू नये यासाठी ग्रामपंचायतने ठराव केले होते. ग्र...

आमदारांना "आमसभा" घेण्यास "अॅलर्जी" जनतेमध्ये तीव्र नाराजी

उपसंपादक  बहुजन भूषण सध्या महाराष्ट्रामध्ये जे आमदार जनतेच्या मतामुळे निवडून गेले त्यांना आपल्या तालुक्याचा व तालुक्यातील जनतेचा विसर पडला आहे असे दिसते. मतदारांना वार्‍यावरती सोडले आहे , आमदारांनी आपल्या मतदार संघात आमसभा घेवून जनतेच्या असलेल्या अडीअडचणी याबाबत अर्ज , निवेदन घेवून चर्चा करून सोडविण्यासाठी आमदारांनी आमसभा घेतली पाहिजे. ज्या तालुक्यातून आमदार झाले त्या तालुक्यात आमदार आमसभा घेताना दिसत नाहीत ही चिंताजनक व खेदजनक गंभीर बाब आहे. आमदारांनी आमसभा घेणे बंधनकारक आहे. तसेच काही आमदार स्टंट करण्यात पटाईत आहेत. मत मागताना निवडणुकीच्या दरम्यान आमदार होण्यासाठी प्रत्येक गावात वाडी वस्तीवर जात होते. परंतु निवडून आलेवर कोण मतदार , कोणता तालुका ? याचा विसर पडला. आमदारांना आमसभा घेण्यास अॅलर्जी आली आहे असे कदाचित दिसते. आमसभा घेणेही जनतेसाठी हिताचे असते.  आमदारांनी आमसभा घेतल्याचे शासकीय दरबारी कागदोपत्री दाखविले जाते की काय ? असे वाटते. आमसभा न घेणार्‍या आमदाराविषयी जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे व त्या आमदारावर जनता उदासीन आहे. केवळ आमदार निधीतून योजनेची ना वे सांगू...

ही शाळा माझी आहे, या शाळेला जेवढी मदत करता येईल तेवढी करीन, ही शाळा मी दत्तक घेतली राम सातपुते (आमदार, माळशिरस विधानसभा)

समता इंग्लिश मेडियम स्कूल नातेपुते या स्नेहसंमेलना निमित्त आपले विचार व्यक्त करताना माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते  उपसंपादक - बहुजन भूषण वृत्तपत्र सालाबादप्रमाणे समता इंग्लिश मेडियम स्कूल नातेपुते ता.माळशिरस , जि.सोलापूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन २३/०१/२०२३ ते २६/०१/२०२३ रोजी पार पडले. यावेळी या शाळेतील विद्यार्थी यांनी चालू घडामोडीवर उपक्रमाची निर्मिती केलेली प्रात्यक्षिक करून दाखविले. या शाळेची स्थापना करून १५ वर्षे होत आहेत. या शाळेतील विद्यार्थी यांनी स्पर्धेमध्ये तसेच इतर खेळामध्ये यश मिळवून शाळेचे नाव लौकिक केलेले आहे. या संमेलनाचे प्रमुख पाहुणे माळशिरस विधानसभेचे आमदार श्री.राम सातपुते व सौ.संस्कृती राम सातपुते यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. त्यावेळी आमदार राम सातपुते म्हणाले की , ही शाळा माझी आहे . या शाळेला जेवढी मदत लागेल तेवढी करीन , ही शाळा मी दत्तक घेतली असे आश्वासन दिले.  तसेच या शाळेला महिन्यात १० कॉम्पुटर देणार असल्याचे सांगितले. तसेच नातेपुते गावाला विकासासाठी १० कोटी रुपयेचा निधि उपलब्ध करून दिलेला आहे. यावेळी सौ.संस्कृती राम सातपुते यांनी आपले...

ग्रामसभेत एखाद्या जाती धर्माच्या कुटुंबाच्या बाबतीत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांनी ग्रामस्थापुढे खोटी दिशाभूल करणारी व चुकीची माहिती देवून बदनामी केली तर त्या पदाधिकारी यांचे पद रद्द होण्यास कारण ठरते

संपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र                     ग्रामसभा ही लोकशाहीतील सर्वोच्च व्यवस्था आहे. २६ जानेवारी १९५० रोजी या भारत देशात पहिला प्रजासत्ताक दिन साजरा झाला त्यामुळे या देशात प्रजेची सत्ता आली. आम्ही सर्व भारतीय नागरिक म्हणून वावरू लागलो. या दिनामुळे लोकशाही आली , स्वातंत्र्य आले. ग्रामसभा ही सार्वभौम आहे. ग्रामसभेला निवडणूक नाही , गावातील प्रत्येक व्यक्ति ग्रामसभेचा सदस्य असतो. ग्रामसभा ही विधानसभा , लोकसभा यांची “जननी” आहे. ग्रामसभेला काही अधिकार देण्यात आले असले तरी सरपंच , उपसरपंच , सदस्य , ग्रामसेवक यांनी कोणत्याही जाती धर्माच्या विषयी खोटी दिशाभूल करणारी चुकीची माहिती ग्रामसभेमध्ये मांडू नये व मांडले व ग्रामसभेतील ग्रामस्थांनी त्या सुचनेला सहमती दाखवली व खोटा ठराव केला त्या सरपंच , उपसरपंच , सदस्य , ग्रामसेवक , अनुमोदक , सूचक व साह्य करणारे जे ग्रामस्थ त्यांचेवरती संघमताने कट रचून त्या कुटुंबाची नाहक बदनामी जाणूनबुजून करण्याच्या हेतूने केलेल्या ठरावानुसार वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक...

रुग्णालयात आलेला रुग्ण आपल्या कुटुंबातील समजून उपचार करा मा.शिवाजी सावंत

  उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते ता.माळशिरस जि.सोलापूर येथे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या हस्ते रक्ताच्या अध्यावत तपासणी यंत्राचा लोकार्पण कार्यक्रम नातेपुते ग्रामीण रुग्णालय येथे पार पडला. यावेळी शिवाजी सावंत म्हणाले की , ग्रामीण रुग्णालयात रुग्ण आला असता अधिकारी व कर्मचारी यांनी चांगली सेवा देवून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा आरोग्य मंत्री मा.तानाजी सावंत यांनी केलेला संकल्प तडीस नेण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा. नातेपुते ग्रामीण रुग्णालयात रक्ताच्या तपासणी यंत्राला त्वरित मंजूरी देवून उपलब्ध करून दिली. त्यामुळे रक्त तपासण्यासाठी रुग्णांचा वेळ व पैसा वाचणार आहे. तसेच कोरोना काळात आरोग्याचे महत्व कळाले आहे. सर्व सुविधा सर्व सामान्यांना मिळाव्यात यासाठी आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत झटत आहेत. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानातून सहा कोटी महिलांची तपासणी केली गेली. रुग्णांना सेवा देण्याचे पवित्र काम अधिकारी व कर्मचारी यांनी करावे. यावेळी सोलापूर ...