Skip to main content

Posts

नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

नातेपुते नगरपंचायतमध्ये सामाजिक क्षेत्रात ठसा उमटविलेले मा.श्री.अविनाशजी दोशी साहेब यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड

  मा.श्री.अविनाशजी दोशी ( संस्थापक) सन्मती सेवा दल व अहिंसा सेवा समिती उपसंपादक वैभव आठवले           नातेपुते ता.माळशिरस   जि.सोलापूर येथील सन्मती सेवा दल व अहिंसा सेवा समिती या सामाजिक संघटनेचे संस्थापक मा.श्री.अविनाशजी दोशी साहेब यांची नातेपुते नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाली. त्यांचे आदर्शवादी सामाजिक कार्य म्हणजे पुरोग्रस्तांना मदत , कोव्हिड-१९ कोरोना काळात अन्नदान , रंजल्या गांजल्यांना मदत , वृक्षारोपण , रक्तदान शिबीर , शिंगणापुर   येथील वानरांना टेम्पोने केळी भरून जगण्यासाठी आधार दिला. विविध सामाजिक ठिकाणी CCTV कॅमेरे , पानपोई असे विविध उत्कृष्ट सामाजिक कामे करून ठसा उमटविला आहे. उच्च शिक्षित , व्यवसायधारक व दयाळूपणाची भूमिका अशी आहे. सामाजिक क्षेत्रात योगदान अतिशय महत्वाचे आहे. ते अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. काही वर्षापूर्वी नातेपुते ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे होते परंतु त्यामध्ये अपयश आले. जनतेने दिलेल्या मताचा कौल स्वीकारून पराभव मान्य केला. खचून न जाता आपले सामाजिक काम पुढ...

सोलापूर जिल्हा काँग्रेस (आय) या पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मा.श्री.डॉ.आजिनाथ रामहरी रूपनवर यांची निवड झाल्याबद्दल नातेपुते येथे पत्रकारांच्या वतीने सत्कार संपन्न

मा.श्री.डॉ.आजिनाथ रामहरी रूपनवर उपसंपादक (वैभव आठवले)            सोलापूर जिल्हा काँग्रेस (आय) या पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मा.श्री.डॉ.आजिनाथ रामहरी रूपनवर यांची निवड झाली आहे. तसेच एक सामाजिक कर्तव्य समजून गोविंद आयुर्वेद व पंचकर्म उपचार केंद्र म्हणून नातेपुते येथे दवाखाना चालवीत आहेत. डॉक्टर हे माजी विधानपरिषद आमदार मा.श्री.अॅड. रामहरी रूपनवर यांचे ते चिरंजीव आहेत. वडील आमदार झाले म्हणून कधीही गर्व बाळगला नाही , मीपणा केला नाही. उच्च शिक्षित असून जनतेशी नाळ जोडलेले असे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मनाचा मोठेपणा असलेले अभ्यासू विचारवंत म्हणून नाव आहे.           एकशिव या गावी ग्रामीण भागात आश्रमशाळा , नातेपुते येथे श्रीराम दूध संघ , आयटीआय कॉलेज , नातेपुते येथे रामहरी रूपनवर ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आहे. या सर्व संस्थांवर डॉक्टर काम पाहत आहेत. त्यांची सोलापूर जिल्हा काँग्रेस आय पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या नातेपुते...

महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष मा.विलासराव कोळेकर सर यांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडणार : मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी. आठवले, सोलापूर जिल्हा महाराष्ट्र पत्रकार संघ प्रमुख संघटक

  अभिमन्यु बी.आठवले  (संपादक साप्ताहिक बहुजन मित्र, साप्ताहिक बहुजन भूषण) (सोलापूर जिल्हा महाराष्ट्र पत्रकार संघ प्रमुख संघटक)  उपसंपादक (वैभव आठवले)           महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष मा.विलासराव कोळेकर सर यांनी संपादक व निर्भिड पत्रकार म्हणून अभिमन्यु बी.आठवले यांना महाराष्ट्र ओळखतो. या महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा प्रमुख संघटकपदी आठवले यांची नियुक्ती करून पत्रकार संघ मजबूत करण्यासाठी जी जबाबदारी टाकली आहे ती पार पाडून महाराष्ट्र पत्रकार संघ सोलापूर जिल्ह्यातील तालुका कार्यकारणी , शहर कार्यकारणी मजबूत करणार असून पत्रकारांच्या असलेल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मा.श्री.विलासराव कोळेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र कार्यकरणी यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना बरोबर घेवून सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र पत्रकार संघ मजबूत करणार आहे. आठवले हे साप्ताहिक बहुजन भूषण व साप्ताहिक बहुजन मित्र या वृत्तपत्राचे संपादक व सडेतोड , बिनधास्त , रोखठोक , मवाळवादी तर कधी जहालवादी विचार मा...

गणेश जयंतीनिमित्त नातेपुते पालखी मैदान येथे रक्तदान शिबीर संपन्न

  रक्तदान शिबिरानिमित्त उपस्थित मान्यवर  उपसंपादक (वैभव आठवले)            नातेपुते पालखी मैदान प्रभाग क्र.३  ता.माळशिरस , जि.सोलापूर येथे दि.०४/०२/२०२२ गणेश जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानिमित्त मा.श्री.माधव खांडेकर साहेब (मुख्याधिकारी साहेब , नगरपंचायत नातेपुते) यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करणात आले. तसेच माधव खांडेकर साहेबांचा माऊली नगर मित्र मंडळातर्फे विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी नातेपुते नगरीतील नूतन नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला.   तसेच कु . प्राची सुधीर उराडे ( MPSC) मध्ये यश संपादन केल्याबद्दल व कु.साक्षी सुधीर गोरे, ऋषिकेश विनायक वाघमारे शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेब मा.श्री.माधव खांडेकर साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की , रक्तदान शिबिरासारखे उपक्रम राबवले गेले पाहिजेत. माझी वसुंधरा अंतर्गत पर्यावरण रक्षणासंबंधी माहिती दिली. तसेच तेथील नागरिकांना ई-प्लेज शपथ देण्यात ...

नातेपुते नगरीचे “चालते बोलते विचारपीठ” म्हणजे मा.श्री.अतुल(बापू) राजेंद्र पाटील होय

  मा.श्री.अतुल(बापू) राजेंद्र पाटील  उपसंपादक (वैभव आठवले)           नातेपुते ता.माळशिरस येथील समाजरत्न राजेंद्र (भाऊ) पाटील यांचे चिरंजीव मा.श्री.अतुल (बापू) राजेंद्र पाटील म्हणजे आपुलकीचे नाते जोडणारे , चालते बोलते विचारपीठ आहेत. प्रेमळ माणूस , माणुसकीचा झरा जपणारे उच्च शिक्षित व्यक्तिमत्त्व म्हणून नावलौकिक मिळवला आहे. सदैव विनयशील म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. कुशल बागायतदार असून संपत्तीचा कधी गर्व नाही. नातेपुते ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच म्हणून दोन वेळा पदभार स्वीकारला. नातेपुते ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाल्याने व निवडणूक लागली , निकाल लागला आणि मा.श्री. अतुल(बापू) राजेंद्र पाटील प्रभाग क्र.१ मधून नगरसेवक म्हणून निवडून आले. प्रत्येक प्रभागात निवडून येण्याचा विक्रम केला आहे. बापूंकडे “मीपणा” नाही. जोडली गेलेली माणस बापूंपासून कधीही दूर जात नाहीत. साधी राहणी , उच्च विचारसरणी म्हणून बापूंकडे पाहिले जाते.           नातेपुते नगरपंचायतमध्ये नगरसेवक म्हणून प्रवेश ...

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सोलापुर जिल्हा पत्रकार संघाच्या प्रमुख संघटक पदी मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी.आठवले यांची निवड

मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी.आठवले  संपादक साप्ताहिक बहुजन मित्र/साप्ताहिक बहुजन भूषण  उपसंपादक (वैभव आठवले) महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष मा.श्री.विलासराव कोळेकर सर यांनी नुकतीच सोलापूर जिल्हा पत्रकार संघाच्या प्रमुख संघटकपदी मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी.आठवले यांची निवड केल्याचे जाहीर केले आहे. आठवले हे साप्ताहिक बहुजन मित्र व साप्ताहिक बहुजन भूषण या वृत्तपत्राचे संस्थापक संपादक पत्रकार आहेत. ते अनेक वर्षे सडेतोड , बिनधास्त , निर्भ्रिड , रोखठोक पत्रकारिता करीत आहेत. ते मवाळवादी व जहालवादी संपादक पत्रकार म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात. तसेच आजूबाजूला घडणार्‍या घडामोडीनुसार परिवर्तनवादी व प्रबोधनवादी व जे दिसेल त्यानुसार रोखठोक आपले विचार मांडत असतात. त्यांची निवड झालेचे कळताच महाराष्ट्रातून सर्व सामाजिक , राजकीय , शैक्षणिक क्षेत्रातील व असंख्य मान्यवरांकडून त्यांचे कौतुक होत आहे. महाराष्ट्र पत्रकार संघाला एक आदर्श व्यक्तिमतत्व असलेले आठवले यांच्या रूपाने पदाधिकारी मिळाल्यामुळे व अध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र कार्यकारणी यांच्या नेतृत्व...

कुबड्यावर आलेल्या महाराष्ट्र सरकारने अॅट्रॉसिटी अॅक्ट कायदा पांगळा करण्याचा कपटनिती डाव रचला आहे तो अन्यायकारक व चीड आणणारा आहे ते परिपत्रक त्वरित रद्द केले जावे

संपादक           या महाराष्ट्रावर एकमेकांच्या मदतीने , एकमेकांच्या आधाराने म्हणजे कुबड्या घेवून बसलेल्या जातिवादी महाराष्ट्र सरकारने १० जानेवारी २०२२ च्या शासन निर्णयाचे जे परिपत्रक काढले आहे ते रद्द करावे. “अॅट्रॉसिटी अॅक्ट” हा कायदा अनुसूचीत जाती जमातीचे रक्षण करणारा कायदा आहे. तो अन्याय होत असेल तरच लागू केला जातो. ज्या जातिवादी महाराष्ट्र सरकारने काढलेले जे परिपत्रक आहे ते अनुसूचीत जाती जमातीवरती अन्यायकारक ठरू शकते. अॅट्रॉसिटी अॅक्ट कायद्यातील गुन्ह्यातील तपास हा पोलिस आयुक्त , पोलिस उपअधीक्षक यांच्याकडे असताना तो त्यांच्याकडून काढून घेवून पोलिस निरीक्षक (गट अ) व सहाय्यक पोलिस निरीक्षक (गट ब) यांच्याकडे करावा असे परिपत्रक सांगत आहे. हे परिपत्रक बेकायदेशीर असून हा कायदा कमकुवत व पांगळा व दुबळा करण्याचा या जातिवादी महाराष्ट्र सरकारचा डाव आहे असे दिसून येत आहे परंतु हा डाव यशस्वी होणार नाही. जे परिपत्रक काढले आहे ते शासनाने रद्द करावे व पूर्वीप्रमाणेच जे तपास अधिकारी आहेत त्यांच्याकडेच तपासची जबाबदारी असावी. पोलिस निरीक्षक व सहाय्यक पो...