Skip to main content

Posts

नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

मनमत हवनअप्पा स्वामी यांची दानशुरांना मदतीचे आवाहन

संपादक           आम्ही आपणाकडे कळकळीची विनंती करतो की आम्ही लातूर जिल्हा येथील औसा तालुक्यातील जय नगर येथील असून आम्ही गेली ७० वर्ष पंढरपूर आळंदी पायी वारी करीत असून आम्हाला मूल बाळ नाही. आम्ही मादवगिरी मागून पोट भरतो. सध्या कोरोना या रोगामुळे गेले ५ महीने वाखरी ता. पंढरपूर येथे राहत आहे. आम्हाला वाखरी येथील एका भक्ताने मोफत राहण्यसाठी खोली दिली आहे. सध्या या कोरोना रोगामुळे माधवगिरी मागणे अवघड झाले आहे. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जगायचे कसे हा प्रश्न उभा आहे ? तरी आम्ही बहुजन भूषण चे संपादक मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले यांच्याकडे आम्हाला मदतीसाठी जीवनावशक वस्तु अगर आर्थिक मदत दानशुरांनी सढळ हाताने करावी याबाबत विनंती केली. तरी ज्या भाविक दानशुरांनी आम्हाला मदत वाखरी ता. पंढरपूर जि. सोलापूर येथे येऊन करावी तसेच ९४२०३०२५६१ वरती संपर्क साधून त्यांच्याकडे मदत द्यावी. ती मदत आमच्यापर्यंत पोहचवण्याचे काम आठवले हे करतील. तरी आम्हाला आपल्या परीने सढळ हाताने मदत करावी. ही आमची कळकळीची विनंती आहे. जनहितार्थ अधिक माहितीसाठी संपर्क संपादक...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरणा घेऊन निघालेले श्री गणेश प्रतिष्ठानचे संस्थापक शेखर (दादा) अटक म्हणजे बहुजन मावळा

शेखर अटक                 संपादक नातेपुते तालुका माळशिरस , जि. सोलापूर येथे शेखर ( दादा ) अटक हे श्री गणेश प्रतिष्ठान चे संस्थापक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार डोळ्यासमोर ठेऊन बहुजन समाजातील विचाराचे युवक एकत्र केले. आपले कर्तव्य समजून सामाजिक बांधिलकी हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येकाच्या आनंदात व दु:खात सहभागी होताना दिसतात. तसेच सर्व समाज सुधारकांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवतात  असा एक आदर्श त्यांनी ठेवला आहे. जे आपण काम करतो ते काम प्रामाणिक व निष्ठेने केले तर हा वेगळाच आनंद देऊन जातो.  बहुजन समाजातील युवक एकत्र करून एक संघपणा , एकात्मता निर्माण केली. शेखर अटक हे एक समाजप्रिय , बहुजन समाजप्रिय , एक आदर्श मित्र , एक आदर्श सामाजिक कार्यकर्ता म्हणून ठसा उमठविला आहे. “मूर्ति लहान पण किर्ति महान” असे म्हटले तर वावगे होणार नाही. शेखर अटक म्हणजे भविष्यातील जनतेचा एक आधार आहे उद्याचे नगरसेवक असतील.  इच्छा असेल तर मार्ग सापडतो ही त्यांची महत्वकांक्षा आहे. आज पर्यंतचे केलेले कार्य महान आहे....

नातेपुते तालुका माळशिरस, जि. सोलापूर येथे संचारबंदी, जमावबंदीचे ग्रामस्थांकडून काटेकोरपणे पालन

संपादक           नातेपुते हे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील शेवटची बाजारपेठ असलेले  गाव आहे. थोड्याच किलोमीटरवरती  पुणे आणि सातारा जिल्हे लागत आहेत. नातेपुतेतील ग्रामस्थ शासकीय आदेशाचे काटेकोरपणे पालन करीत आहेत. मुंबई पुणे येथून आलेल्या व्यक्तीला कॉरंनटाईन केले आहे त्याची देखभाल प्रांत (अकलूज), डी वाय एस पी (अकलूज), तहसीलदार (माळशिरस), गटविकास अधिकारी (माळशिरस), नातेपुते पोलीस स्टेशन चे युवराज खाडे साहेब व त्यांचे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी इ. नातेपुते गावात कोरोना या रोगाची लागण होऊ नये म्हणून झटत आहेत.  अधिक माहितीसाठी संपर्क  संपादक - मा. डॉ. श्री. अभिमन्यू  बी.आठवले ९४२०३०२५६१                                                                                    ...

मा. वैभव शहा म्हणजे कुटुंब वात्सल्य नेतृत्व

मा. वैभव शहा म्हणजे कुटुंब वात्सल्य नेतृत्व संपादक       वैभव सुरेंद्र शहा रा. नातेपुते ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील असून सर्व धर्म समभाव असा एक दिलदारपणा, आपुलकी, सेवाभावी वृत्ती, दयाळूपणा वैभव सुरेंद्र शहा यांच्याकडे आहे ते लहानथोर असुद्या त्यांना प्रचंड आदर देतात.  वैभवजी यांना संस्काराचे बाळकडू आई वडिलांपासून मिळाले. चांगले करता आले नाहीतर वाईट तरी करू नये ही शिकवण वैभवजी यांना आई वडिलांनी दिली. आपले कर्तव्य समजून रंजल्या गांजलेल्यांना मदत करणे हे त्यांचे गुण आहेत माणुसकी जपणे हेच कर्तव्य समजून कार्य करीत आहेत. लहानथोरांना आपला मित्र समजून मान देतात. आई वडिलांच्या सोबत राहून इलेक्ट्रॉनिकचे रीपेरिंगचे काम करून उदरनिर्वाह करीत असताना एखाद्याचे दुःख वेदना आपत्यकाळ यामध्ये आपले कर्तव्य समजून मदत करतात, धावून जातात हाच मला फार मोठा आनंद वाटतो अशी भूमिका वैभव यांची असते. सर्व बंधुभावाचे कुटुंब हेच आपले कुटुंब समजतात त्यामुळे ते इतरांचे कुटुंब हे आपले कुटुंब समजून मिळून मिसळून राहतात त्यामुळे माणुसकीचे दर्शन वैभवजी कडे आहे. ते विविध ठिकाणी कार्यक्रमात भाग घेऊन कर...

दानशूर राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!

दानशूर राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...! राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साप्ताहिक बहुजन भूषण कार्यालयामध्ये साजरी करण्यात आली. संपादक - अभिमन्यू  बी.आठवले ९४२०३०२५६१  उपसंपादक - वैभव अ. आठवले  साप्ताहिक बहुजन भूषण ,साप्ताहिक बहुजन मित्र  बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आठवले परिवार

कॉरंनटाईन च्या नावाखाली माणसाचा छळ करू नका

संपादक       कोरोना covid-19 या रोगाचे आपत्य देशावर व देशातील जनतेवर आले आहे. संचारबंदी, जमावबंदी आहे. कामानिमित्त बाहेर गावी गेलेल्या व्यक्ती लॉकडाऊन च्या काळात आपल्या गावी येत आहेत परंतु गावातील पुढारी, शासकीय अधिकारी त्यांना जाणूनबुजून कॉरंनटाईन करीत आहेत. त्यांची येताना तपासणी केलेली असते, वरिष्ठ अधिकारी यांचे प्रमाणपत्र असते असे असताना केवळ बाहेरून आल्याचा ठपका ठेऊन गावातील पुढारी राजकारण करून माणुसकी सोडून वागत आहेत ही चिंताजनक बाब आहे अशी परिस्थिती देशात व राज्यात आहे . कॉरंनटाईन करा, काळजी घ्या, त्यांचा अपमान करू नका, त्यांना वेदना होईल असे वागू नका, त्यांचा मानसिक छळ करू नका, छळ करणे हा गंभीर गुन्हा आहे. कॉरंनटाईन केले आणि एखाद्या व्यक्तीचे बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार पुढारी व अधिकारी असतील. त्यामुळे माणुसकी जपा एवढेच... 🙏जनहितार्थ🙏                                                                ...

भारत देशाचा तिरंगा ध्वज काळी टोपी घालून फडकावणे हा गंभीर अपमान व जो फडकावील तो या देशाचा दुश्मन

संपादक                भारत देशाचा तिरंगा ध्वज हा देशाचा व देशातील जनतेचा अभिमान, स्वाभिमान आहे असे असताना २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन), १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन), १ मे (महाराष्ट्र दिन) या दिवशी भारताचा तिरंगा ध्वज काळी टोपी घालून पंतप्रधान, राष्ट्रपती, सर्व राज्याचे राज्यपाल, पालकमंत्री, सर्व मंत्री,  सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी ते सरपंच इतर कोणीही यांनी काळी टोपी घालून राष्ट्रध्वज फडकवू नये जो राष्ट्रध्वज फडकाविल तो देशाचा दुश्मन समजला जाईल. यापूर्वी ज्यांनी काळी टोपी घालून राष्ट्रध्वज फडकावला त्यांचा आम्ही निषेध करतो. तसेच एखाद्या सभेच्या वेळी एखाद्या युवकाने काळा शर्ट घालून कार्यक्रमाच्या ठिकाणी आला असता त्याठिकाणी त्या युवकाला थांबू देत नाहीत हाकलून देतात मग हा तर देशाचा तिरंगा ध्वज काळी टोपी घालून फडकावणे हा तर मोठा गंभीर गुन्हा आहे. 🙏जनहितार्थ🙏                                                   ...