Skip to main content

मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार, नगरसेवक असून काय उपयोग, नगरसेवक नाराज

अहिंसा सेवा समितीचे संस्थापक मा.श्री.अविनाशजी दोशी साहेब (नातेपुते नगरपंचायत, नगरसेवक) यांच्या सामाजिक कार्याची ओळख महाराष्ट्रभर

मा.श्री.अविनाशजी दोशी
संस्थापक - अहिंसा सेवा समिती 
नातेपुते नगरपंचायत नगरसेवक

उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण

          नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील अहिंसा सेवा समितीचे संस्थापक मा.श्री.अविनाशजी दोशी नातेपुते नगरपंचायत नगरसेवक यांचे सामाजिक कार्य एक इतिहास बनत चालला आहे. अहिंसा सेवा समितीच्या माध्यमातून सामाजिक कार्य जोमाने व दिमाखदार चालू आहे. भुकेलेल्यांना अन्न, गरजूंना पाणी, अनाथांना पांघरून घेण्याइतपत कपडे, संकट काळात मदत, रोगराई काळात मदत, सर्वधर्म समभाव या नात्याने सर्व सामाजिक उपक्रमात सहभाग, वृक्षारोपण, व्यवसायभिमुख उपक्रम असे विविध उपक्रम राबवित आहेत. “अहिंसा “ याला समोर ठेवून आपले कर्तव्याचे पालन करीत आहेत. द्वेष, मत्सर, भेदभाव, निंदा, वाईट बोलणे याबाबत दक्षता घेवून आपली वाटचाल करीत आहेत. रागाला जवळ करती नाहीत. आदर द्या आदर घ्या ही भूमिका त्यांची अतिशय मौल्यवान ठरत आहे. माणुसकी कशी जपावी, मैत्री कशी करावी याचे ज्वेलंत उदाहरण म्हणजे अविनाश दोशी होय. सत्ता, संपत्तीचा कधी गर्व नाही, एक मनमिळावू सामाजिक कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली आहे. विनयशिलता, नम्रपणा हे गुण त्यांचे मोठेपण सांगतात. कर्तव्य समजून जे सामाजिक कार्य करता येईल ते करीत असतात. जे सामाजिक कार्य करतात ते “उपकार” म्हणून करीत नाहीत तर ते आपुलकी, बंधुभाव, माणसातील भक्तीभाव या हेतूने करीत असतात. प्रामाणिकपणा, आपलेपणा ही त्यांची विचाराची “शिदोरी” माणुसकीचे दर्शन घडविते. सामाजिक काम करीत असताना तळमळ” ही भावना दिसून येते. सर्वधर्म समभाव ही माझी बांधिलकी आहे त्याला तडा जाऊ देणार नाही असेही त्यांच्याबाबतीत आढळून आले आहे. सदैव मनमोकळेपणा, हसतमुख, कधी घमेंड नाही असे वर्तन असते. गरीबी, श्रीमंती ह्या प्रत्येकाच्या वाटेला आलेले सुखदुख ही ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग असतो त्यामुळे त्यांना कमी लेखणे असे काहीही नसते. सामाजिक काम करताना आनंदी राहून केले पाहिजे असे त्यांचे मत असते हे अनुभवातून पाहिले तेच लिहले. मा.अविनाश दोशी साहेब, नगरपंचायत नातेपुते नगरसेवक आपण करीत असलेले सामाजिक कार्य एक दिशा देत राहील, चकाकत राहील, आठवणीत राहील असे करीत आहात. तुम्हास खूप खूप शुभेच्छा...!

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसेलजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

अवैधरित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगणा-या इसमास अटक अकलूज उपविभागीय गुन्हे प्रकटीकरण पथकाची विशेष कामगिरी

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये पुणे पंढरपुर रोडलगत मौजे मांडवे ता माळशिरस येथे असलेल्या अहिल्याचौक येथे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अनिकेत महादेव पडसळकर, रा. खंडाळी, ता. माळशिरस हा व्यक्ती स्वतः जवळ अवैधरीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ कारवाई केली. दिनांक २०/०९/२०२५ रोजी पहाटे ०३.२५ वाजता मौजे मांडवे, येथील अहील्या चौक ता. माळशिरस येथे सदर इसमास पकडण्यात आले. सदर आरोपीचे अंगझडती तपासणी दरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर सदर घडले प्रकाराबाबत नातेपुते पोलीस ठाणेकडील पोना/५६२ राकेश माणिक लोहार यांचे फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं ३२९/२०२५ शस्त्र अधिनियम कायदा कलम ३,२५ प्रमाणे दिनांक २०/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहे...