Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

शासनाच्या योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ जनतेला मिळाला पाहिजे यासाठी बाळासाहेबाची शिवसेना (शिंदे गट) मा.श्री.राजकुमार शंकरराव हिवरकर पाटील माळशिरस तालुका अध्यक्ष यांची आदर्श कामगिरी

मा.श्री.राजकुमार शंकरराव हिवरकर पाटील माळशिरस तालुका अध्यक्ष
बाळासाहेबाची शिवसेना (शिंदे गट)

उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण

          नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात ठसा उमठविलेले मा.श्री.राजकुमार शंकरराव हिवरकर-पाटील बाळासाहेबांची शिवसेना(शिंदे गट) माळशिरस जि.सोलापूर यांनी शिवसेना तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी घेतले पासून विविध प्रश्नावर लक्ष देवून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कर्तव्यदक्षपणे जबाबदारी पार पाडीत आहेत. जनतेच्या हिताचे प्रश्न मार्गी लावत आहेत. त्यांची कामगिरी आदर्श ठरत आहे. त्यांच्या कामगिरीचे कौतुक जनतेकडून होत आहे. पक्षाचे काम जोमाने करीत आहेत. पक्ष वाढीसाठी वेळ, पैसा खर्च करीत आहेत. शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करीत आहेत. प्रधानमंत्री आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजना राबविण्यात यावी यासाठी मा.वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय नातेपुते, मुख्याधिकारी नगरपंचायत, नातेपुते, मा.जिल्हा समन्वयक डॉ.रवी भोपळे सोलापूर, तालुका वैद्यकीय अधिकारी माळशिरस यांना पत्र पाठविले आहेत. नातेपुते व परिसरातील असंख्य लोकांची प्रधानमंत्री आयुष्यमान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजना यामध्ये नोंदी झालेल्या नाहीत त्यामुळे शिबिराचे आयोजन करून त्वरित आपल्या यंत्रणेमार्फत नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्याबाबत जनजागृती करावी व आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कार्ड लाभार्थी यांना मिळाले पाहिजे त्यासाठी झटत आहेत. मा.राजकुमार हिवरकर पाटील जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन जनता आनंदी राहील, वेदनामुक्त राहील याची काळजी घेत आहेत. कर्तव्यात कसूर करणार्‍या अधिकार्‍याची गय केली जाणार नाही असेही म्हणाले. आयुष्यमान भारत प्रधान जनआरोग्य योजने अंतर्गत १२०९ उपचारकरिता प्रतिकुटुंब, प्रतिवर्ष ५ लाख वैद्यकीय संरक्षण मिळते. महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेमुळे ९९६ उपचाराकरिता प्रतिकुटुंब, प्रतिवर्ष १.५ लाख विमा संरक्षण मिळते. तसेच मूत्रपिंड प्र्त्यारोपणासाठी रुपये २.५ लाख पर्यंत विमा संरक्षण मिळते असे मा.राजकुमार हिवरकर पाटील यांनी जनतेला याचा लाभ मिळावा म्हणून वरील कार्यालयाकडे पत्र व्यवहार करून उपक्रम राबविण्याबाबत कळविले आहे.

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसेलजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...