Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

वाखरी ता.पंढरपूर जि.सोलापूर येथे दर महा पन्नास हजार युनिटची चोरी मीटर धारकांना बसतोय फटका

संपादक : बहुजन भूषण वृत्तपत्र

वाखरी :         वाखरी ता.पंढरपूर जि.सोलापूर या गावी मोठ्या प्रमाणात आकडे टाकून प्रकाशाचा आनंद घेणारे वीज चोरी धारक आहेत. रात्रंदिवस आकडे टाकून वीज चोरी करून मजेत राहत आहेत. ही वीज चोरी वाखरी येथील स्मशानभूमी, बागवान वस्ती, रामोशी समाज, वाडी-वस्ती इ. ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे. वाखरी गावात जे वीज वितरण कंपनीचे जे कर्मचारी आहेत ते "आंधळे” आहेत. त्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधली आहे. त्यांना वीज चोरी करणारे वीज चोर दिसत नाहीत. त्यांना वीज चोरी करणार्‍याकडून दर महिना हफ्ते आहेत असे वाटते. वीज चोरी करणारे चोर वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी यांना दिसत नाही. परंतु एखाद्या मीटर ग्राहकाचे वीज बिल थकले की, हे कर्मचारी त्वरित वीज कट करतात. तसेच २६-०९-२०२२ रोजी पत्र जा.क्र.५५५ वीज वितरण कार्यालय शाखा अभियंता गादेगाव ता.पंढरपूर यांना वीज चोरी बाबत बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य अभिमन्यु बी. आठवले यांनी पोस्टाने पत्र पाठविले आहे. तरीपण अधिकारी यांनी दखल घेतलेली नाही असे दिसून आले आहे. वाखरी येथील वीज वितरण कंपनीचे जे कर्मचारी आहेत यांनी तात्काळ वीज चोरी करणारे वीज चोर आहेत त्यांना दंडात्मक व फौजदारी स्वरूपाची कायदेशीर कारवाई करून वीज वितरण कंपनीचा “करंट” देण्यात यावा. तसेच आठवले यांचे बहुजन भूषण कार्यालय असून त्या कार्यालयावरून विजेची लाईन गेली आहे. त्या तारेवरून तेथे राहत असलेल्या ग्रामस्थांनी त्या तारेवरती आकडे टाकून बिनधास्त प्रकाशाचा आनंद घेत आहेत. काही वीज चोर रहायला गावठाण जागा, वीज चोरी करून प्रकाशाचा आनंद घेतात आणि घमेंड मात्र करतात. अशा वीज चोर हरामखोर यांना करंट दिला पाहिजे. या वीज चोरीमुळे मीटर ग्राहकांना जास्त विजबिल येत आहे. जनतेच्या अनेक तक्रारी आहेत. त्यांचा फटका मीटर ग्राहकांना बसत आहे. वीज चोर करणारे आयशो आरामात प्रकाशाच्या उजेडात राहत आहेत. वीज वितरण कंपनीने रामोशी समाज, बागवान वस्ती, स्मशानभूमी येथील तारेवरती पिविसी पाईप घालून वीज चोरी थांबवणे गरजेचे आहे. तर रामोशी समाजा लगत असलेल्या तारावरती आकडे टाकून तेथील वीज चोर गेली अनेक वर्ष वीज चोरी करीत आहेत. वाखरी येथील वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आंधळे आहेत. तरी पंढरपूर विभागीय गादेगाव येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांनी वाखरी येथे “डोळस” कर्मचारी नेमावेत. वीज चोरी वाखरी गावातील कर्मचारी यांनी थांबवावी. वीज चोरी थांबवली नाही तर त्या कर्मचार्‍यांची गय करणार नाही. तरी वीज वितरण कंपनीचे पंढरपूर विभाग ग्रामीण व गादेगाव शाखा अभियंता यांनी त्वरित दखल घ्यावी व त्वरित वाखरी येथील वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी यांना आदेश देण्यात यावा असे प्रसिद्धीद्वारे अभिमन्यु बी. आठवले यांनी केले आहे.

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसेलजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...