Skip to main content

मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार, नगरसेवक असून काय उपयोग, नगरसेवक नाराज

नामजपामुळे माणसं एकत्रित येण्याचे पवित्र काम : विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण

          कारुंडे (लोंढेवस्ती) ता.माळशिरस, जि.सोलापूर येथे चैतन्य जप प्रकल्पाचे २२ वे राज्यस्तरीय शिबीर आयोजित केले होते. या नाम जपामुळे माणसं एकत्र येतात. व्यसनाच्या आहेरी गेलेली, बिघडलेली, जातीपातीत द्वेष, मत्सर, भेदभाव होत आहेत तो या नामजपामुळे नाहीसे होऊन आम्ही सारे बांधव आहोत हाच संदेश यामधून मिळतो आहे. नामजपाच्या माध्यमातून माणसे घडविण्याचे काम केले जाते. सामाजिक समतोल यामधून राखला जातो. संत ज्ञानेश्वर महाराज, ब्रम्हचैतन्य महाराज यांनी दिला आहे असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. यावेळी परमपूज्य शिवानंद भारती महाराज, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहते-पाटील, माजी जिल्हा परिषद सोलापूर उपाध्यक्ष बाबाराजे (दादा) देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यानिमित्त ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रतिमेची हत्तीवरून शोभा यात्रा काढली. तसेच पुढे रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, माणूस हा सध्या लोभी झाला आहे, त्याला हाव सुटली आहे असे असताना त्यामध्ये ते समाधानी नाहीत. मनाला शांती देणारा धर्म माणसाने जोपासावा. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी, श्रद्धा ही ठेवली पाहिजे असे म्हणाले. यावेळी परमपूज्य शिवानंद भारती महाराज यांनीही नामजपाचे महत्व सांगितले तसेच चैतन्य नामजप प्रकल्पाचे कार्याध्यक्ष व शिबीर प्रमुख मा.धैर्यशील देशमुख म्हणाले, साधू संतांनी नामस्मरण, भक्ती किती महत्वाचे आहे हे सांगितले. महाराष्ट्रभर चैतन्य जप शाखा आहेत. या जपामुळे महाराष्ट्रात नावलौकिक झाले आहे. फसव्या गुरुपासून सावध राहिले पाहिजे. चांगले गुरु तपासा असे देशमुख म्हणाले. यावेळी, शिबीर प्रमुख धैर्यशील देशमुख, मिनादेवी देशमुख, माजी सरपंच अमरशील देशमुख, तात्यासाहेब देशमुख, नातेपुते नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापति मामासाहेब पांढरे, ह.भ.प.राजेंद्र महाराज मोरे, साहेबराव देशमुख, नवनाथ महाराज, अर्जुन काटे, ज्ञानेश्वर लावंड, धनंजय पवार, हनुमंत पाटील, सतीश बर्गे, सतीश बडवे, दिगंबर लाळगे, माऊली ठोंबरे इ. उपस्थित होते. सूत्रसंचालन औदुंबर बुधावले सर यांनी केले.

बातमी      

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसेलजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

  

 

 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

अवैधरित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगणा-या इसमास अटक अकलूज उपविभागीय गुन्हे प्रकटीकरण पथकाची विशेष कामगिरी

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये पुणे पंढरपुर रोडलगत मौजे मांडवे ता माळशिरस येथे असलेल्या अहिल्याचौक येथे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अनिकेत महादेव पडसळकर, रा. खंडाळी, ता. माळशिरस हा व्यक्ती स्वतः जवळ अवैधरीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ कारवाई केली. दिनांक २०/०९/२०२५ रोजी पहाटे ०३.२५ वाजता मौजे मांडवे, येथील अहील्या चौक ता. माळशिरस येथे सदर इसमास पकडण्यात आले. सदर आरोपीचे अंगझडती तपासणी दरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर सदर घडले प्रकाराबाबत नातेपुते पोलीस ठाणेकडील पोना/५६२ राकेश माणिक लोहार यांचे फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं ३२९/२०२५ शस्त्र अधिनियम कायदा कलम ३,२५ प्रमाणे दिनांक २०/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहे...