वाखरी गावाला जोडणारे रस्ते तात्काळ दुरुस्त करून ग्रामस्थांचे हाल थांबवावे : वाखरी ग्रामसभेत ग्रामस्थांची मागणी
संपादक : पंढरपूर साप्ताहिक बहुजन भूषण
मिळालेल्या माहितीनुसार - वाखरी ता.पंढरपूर जि.सोलापूर ग्रामपंचायत कार्यालय येथे विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली होती. या ग्रामसभेत ग्रामस्थांनी मतदान ओळख पत्र आधारकार्ड सोबत लिंक करून घ्यावे असे आवाहन ग्रामपंचायतने केले. ही ग्रामसभा सरपंच धनश्री तानाजी साळुंखे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ग्रामस्थांनी वाखरी ते कोर्टी, वाखरी ते शिंदेवस्ती या रस्त्याची दुरूस्ती करून ग्रामस्थांना होणारा त्रास थांबविण्यात यावा अशी मागणी केली गेली. वाखरी गावाला जे जोडले गेलेले रस्ते म्हणजे वाखरी ते कोर्टी रस्ता तसेच वाखरी ते शिरढोन रस्ता पुर्णपणे उखडला असून ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच वाखरी ते शिंदेवस्ती रस्त्याचा प्रश्न ग्रामपंचायत अस्तीत्वात आले तेव्हापासून ते आजतागायत मार्गी लागलेला नाही. त्यामुळे शिंदे वस्तीच्या ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. त्वरित रस्त्याची दुरूस्ती करून रस्ता बनवण्यात यावा. रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. या रस्त्यावरून येणे-जाणे अवघड झाले आहे. या रस्त्यावरून वयोवृद्ध, महिला, पुरुष, शाळकरी मुलांचे हाल होत आहेत त्यामुळे रस्त्याची दुरूस्ती जलदगतीने करण्यात यावी यासाठी ग्रामपंचायत वाखरी यांनी विशेष ग्रामसभा बोलावली होती. यावेळी उपसरपंच सोमनाथ पोरे, ग्रामसेवक सावता शिंदे, सदस्य छायादेवी लोखंडे, उषाबाई जगताप, वैशाली पांढरे, दीपाली पिसे, वर्षा पवार, कविता पोरे, ज्ञानेश्वरी सरगर, संजय अभंगराव, चंद्रकांत चव्हाण, संग्राम गायकवाड, विक्रम घोडके, संजय लेंगरे, ज्योतीराम पवार, पोलिस पाटील बाळासाहेब शेंडे, शिवाजी मदने, मुकुंद राजगुरू, सुरेश लोखंडे, महेश घोडके, महादेव गायकवाड, अंगणवाडी सेविका सुरेखा गोसावी, अंशुमन शिंदे, लता गुजर, दत्तात्रय वाघमारे, तांबोळी, सुनीता जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी नानासाहेब पोरे, विठ्ठल लोखंडे, लक्ष्मण वाघमोडे, करण कांबळे, सुभाष शिंदे इ. असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.
Comments
Post a Comment