Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

गायरान जमिनीवर अतिक्रमणे नियमित केली गेली पाहिजेत त्या कुटुंबाला बेघर करू नये

उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण

          सध्या गायरान जमिनीवर अतिक्रमणे काढण्यात येणार असल्यामुळे गोरगरीब कुटुंबावर अन्याय होणार आहे. शासनाने वेळोवेळी परिपत्रके काढून गावठाणामध्ये राहत असलेल्या कुटुंबाची घर जागा नियमित करण्यात यावी असे असंख्य परिपत्रके शासनाने काढलेली आहेत व लाखो कुटुंबाची घर जागा नियमित करून त्यांना शासनाच्या लोककल्याणकारी योजना देवून आधार दिला आहे. अतिक्रमणे ही गायरान जमिनी असो वा ग्रामपंचायत गावठाण असो. कुटुंबाच्या सदस्यानुसार ती जागा त्या कुटुंबाच्या नावावर करावी असे शासनाचे परिपत्रक सांगते. गायरान जमिनी त्या कुटुंबांनी मोठ्या प्रमाणात धरून त्या वहिवाट करून कब्जा केला आहे. त्याची मोजणी केली गेली पाहिजे व गरजेनुसार शासनाच्या परिपत्रकानुसार ती जागा देवून कायम करावी, त्यांना बेघर करू नये, उध्वस्त करू नये. महाराष्ट राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय पुढार्‍यांनी सत्तेचा दुरुपयोग करून शासनाच्या गायरानी जमिनी, गावठाण जागा बळकावून कब्जा केला आहे. त्याचप्रमाणे आजी-माजी ग्रामपंचायत मधील कारभारी, पंचायत समिति, जिल्हा परिषद, आमदार, खासदार यामधील राजकर्त्यांनी शासकीय जागा बळकावून कब्जा केला आहे. गायरान, पाटबंधारे, ग्रामपंचायत गावठाण यामध्ये मोठया प्रमाणात राजकर्त्यांनी कब्जा केला आहे व वहिवाट केली आहे. त्या जागेची चौकशी करावी, चौकशी शिवाय त्या कुटुंबांना बेघर करू नये. जे कुटुंब भारत देश स्वतंत्र झालेपासून त्या गायरान असो वा पाठबंधारे, वनीकरण, गावठाण जागेवरती राहत आहेत. त्यांना त्यांचे गरजेनुसार जागा देवून त्या नियमित केल्या गेल्या पाहिजेत. त्या जागा मोठय प्रमाणात राजकीय मंडळींनी कब्जा करून अधिकार्‍यांना हाताशी धरून नावे लावून घेतलेल्या आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्र राज्यात ग्रामपंचायत गावठाण जागेवरती ज्या त्या काळातील ग्रामपंचायत कारभारी यांनी ठराव करून त्या जागा नियमित केलेली करोडो कुटुंब आहेत त्यांना शासनाच्या लोककल्याणकारी देण्यात आलेल्या आहेत. असे असताना निमित मात्र गायरान जमिनीवर अतिक्रमणे काढण्याचे पुढे करून इतर जागेवरील केलेले अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची वार्‍यासारखी बातमी महाराष्ट्रात पसरली त्यामुळे अतिक्रमण धारक गोरगरीब कुटुंब भयभीत झाले आहे. शासकीय जागेवरती पक्के, कच्चे अशी घरे त्या कुटुंबांनी बांधून निवारा केला आहे. असे असताना गोरगरीबांना उध्वस्त करून शासन साध्य काय करणार? जनतेच्या जिवावर राज्यकर्ते बनला आहे. ज्या कुटुंबांनी अतिक्रमण केले आहेत ती जागा मोजून गरजेनुसार त्या कुटुंबाला देण्यात यावी व त्याजागेची कर आकारणी त्या-त्या विभागाने त्या कुटुंबाकडून वसूल करून महसूल गोळा केला पाहिजे. जरूर अतिक्रमणे काढा पण त्या कुटुंबाची सदस्य संख्या व गरज बघून चौकशी करून मगच काढण्यात यावी व काढताना ते कुटुंब उध्वस्त होणार नाही, पर्यायी त्या कुटुंबाची व्यवस्था करावी. कुटुंबाला गावठाण जागेपेक्षा गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. अतिक्रमणे काढताना त्या कुटुंबाची पूर्ण चौकशी करून ते कुटुंब बेघर होणार नाही, उध्वस्त होणार नाही याची काळजी घेवून अतिक्रमणे हटवावेत. अथवा हुकुमशाही पद्धतीने कुटुंबावर अन्याय करत असाल तर बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना शासन दरबारी आंदोलन उभारेल असे संस्थापक अभिमन्यु आठवले यांनी प्रसिद्धीद्वारे केले आहे.    

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसेलजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

 

 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...