Skip to main content

मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष मा.सतीश सपकाळ व नातेपुते शहर अध्यक्ष समीर शेख यांच्याकडून नूतन निवड झालेल्या पत्रकार बांधवांचा सतीश सपकाळ यांच्या निवास स्थानी सत्कार संपन्न

 

मा.सतीश सपकाळ व नातेपुते शहर अध्यक्ष समीर शेख यांच्याकडून नूतन निवड झालेल्या पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर


उपसंपादक : बहुजन भूषण वृत्तपत्र

           नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर येथे ऑल जर्नालीस्ट & फ्रेंड सर्कल राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेची माळशिरस तालुका कार्यकारणी केंद्रीय व महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मान्यतेने घोषित करण्यात आली. त्यामुळे सतीश सपकाळ माळशिरस तालुका उपाध्यक्ष शिंदे गट व समीर शेख नातेपुते शहर अध्यक्ष शिंदे गट यांनी नूतन पत्रकार यांचा सत्कार सतीश सपकाळ यांच्या निवासस्थानी करण्यात आला. यावेळी डॉ.अभिमन्यु बी. आठवले माळशिरस तालुका अध्यक्ष, श्रीराम भगत महाराज माळशिरस तालुका उपाध्यक्ष, हनुमंत माने माळशिरस तालुका सचिव, विलास भोसले माळशिरस तालुका कार्याध्यक्ष, उमेश पोतदार माळशिरस तालुका सरचिटणीस, सदस्य इ.चा फेटा व हार घालून सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सतीश सपकाळ म्हणाले की, पत्रकार हा अन्याय अत्याचार झालेल्यांना वाचा फोडण्याचे काम करीत असतो. पत्रकारांमुळे दरोराज घडत असलेल्या घटना पत्रकारामुळे उजेडात येतात. पत्रकार हा समाजाचा कणा आहे. तसेच अभिमन्यु आठवले  तालुका अध्यक्ष म्हणाले की, आज आमच्या नूतन पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी बांधवांचा सत्कार करण्यात आला तो सत्कार आमच्यासाठी बळ आहे. या संघटनेच्या माध्यमातून चांगले उपक्रम राबवून या संघटनेचे नाव निघेल असे काम करणार आहे. आमच्यावरती जी जबाबदारी राष्ट्रीय कार्यकारणी व महाराष्ट्र कार्यकरणी यांनी सोपवली या जबाबदारीला कोठेही गालबोट लागू देणार नाही. या सत्कार प्रसंगी बापूराव खिलारे, भाजप अनुसूचीत जाती मोर्चा तालुका अध्यक्ष, अक्षय मिसाळ, विशाल खुडे, रूपेश लांडगे, संतोष लांडगे, गणेश लांडगे, किसन पाटोळे, सतीश लांडगे उपस्थित होते.  


बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत ...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...