Skip to main content

मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार, नगरसेवक असून काय उपयोग, नगरसेवक नाराज

सतीश आनंदा सपकाळ यांच्या “खमक्या” नेतृत्वामुळे मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाला माळशिरस तालुक्यात मोठा आधार

 

मा.श्री. सतीश आनंदा सपकाळ 
(मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्य
शिवसेना, माळशिरस तालुका उपाध्यक्ष)

उपसंपादक

                    नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील सतीश आनंदा सपकाळ यांनी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटात प्रवेश केला. त्यांना नुकतेच पत्र देवून त्यांच्यावरती माळशिरस तालुक्याचे उपाध्यक्ष पद देण्यात आले आहे. सतीश आनंदा सपकाळ यांना तालुकाच काय पण अखंड सोलापूर जिल्हा ओळखत आहे. त्यांना सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर ओळखत आहेत. त्यांनी अनेक संघटनेत प्रामाणिकपणे काम केले आहे परंतु माझ्या सोबत जे कार्यकर्ते आहेत त्यांना त्यांच्या रोजारोटीचा प्रश्न भेडसावत आहेत तो सोडविला गेला नसल्यामुळे त्यांनी इतर पक्षाचा व संघटनेचा पदभार सोडला. सतीश आनंदा सपकाळ यांची चळवळ म्हणजे गोर-गरीब, शेतकरी, शेतमजुर यांच्या अडीअडचणी सोडवणे हाच प्रयत्न असतो. ज्या सामाजिक संघटनेत किंवा राजकीय पक्षात काम करीत असताना जनतेची कामे केली जावेत अशीच भूमिका सपकाळ यांची असते. सतीश सपकाळ आणि जनता समीकरण झाले आहे. सतीश सपकाळ यांच्या रूपाने माळशिरस तालुक्यातील जनतेला “खमक्या” असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाला पदाधिकारी मिळाला असल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सपकाळ यांच्याकडे कार्यकर्त्यांचा जनसमुदाय आहे. काही दिवसात जि.प.पंचायत समिति इ.च्या निवडणुका लागणार असून या निवडणुकीत मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी सतीश सपकाळ यांची कामगिरी मोलाची ठरणार आहे. कोणताही व्यवसाय करीत असताना सपकाळ यांनी फायदा तोटा बघितला नाही. आपल्या बरोबर आपल्या कार्यकर्त्याची “चूल पेटली पाहिजे” अशी भूमिका सपकाळ यांची असते. सर्व समाजात मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्व आहे. मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाला एक खमक्या माळशिरस तालुका उपाध्यक्ष म्हणून लाभले आहेत त्याचा फायदा शिंदे शिवसेना गटाला होईल. एक धाडसी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी या अगोदर सामाजिक संघटनेत व राजकीय पक्षात काम केले परंतु तिथे कार्यकर्त्यांची कदर केली गेली नाही म्हणून त्यातून बाहेर पडले व तटस्थ राहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाला माळशिरस तालुका उपाध्यक्ष म्हणून एक चांगला पदाधिकारी मिळाला त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा फायदा होणार आहे. त्यांना जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांची साथ लाभणार आहे इतकेच.

बातमी

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

 

 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

अवैधरित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगणा-या इसमास अटक अकलूज उपविभागीय गुन्हे प्रकटीकरण पथकाची विशेष कामगिरी

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये पुणे पंढरपुर रोडलगत मौजे मांडवे ता माळशिरस येथे असलेल्या अहिल्याचौक येथे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अनिकेत महादेव पडसळकर, रा. खंडाळी, ता. माळशिरस हा व्यक्ती स्वतः जवळ अवैधरीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ कारवाई केली. दिनांक २०/०९/२०२५ रोजी पहाटे ०३.२५ वाजता मौजे मांडवे, येथील अहील्या चौक ता. माळशिरस येथे सदर इसमास पकडण्यात आले. सदर आरोपीचे अंगझडती तपासणी दरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर सदर घडले प्रकाराबाबत नातेपुते पोलीस ठाणेकडील पोना/५६२ राकेश माणिक लोहार यांचे फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं ३२९/२०२५ शस्त्र अधिनियम कायदा कलम ३,२५ प्रमाणे दिनांक २०/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहे...