Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

दहिगाव ता.माळशिरस जि.सोलापूर येथील ग्रामस्थांना दूषित पाणी पुरवठा केला जात आहे त्यामुळे मनुष्यहानी होण्याची दाट शक्यता आहे स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा असे गट विकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांनी त्वरित लक्ष घालावे: बाबुराव मारुती खिलारे (भाजप अनुसूचीत जाती मोर्चा माळशिरस तालुका अध्यक्ष)

उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण

          मिळालेल्या निवेदनावरून दहिगाव ता.माळशिरस, जि.सोलापूर येथे ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक कर्णे हे असून ते कामात कुचराई व बेफिकीर असून कामात हलगर्जीपणा करीत आहेत. गावातील ग्रामस्थांनी भेटून सुद्धा ग्रामसेवक टाळाटाळ करीत आहेत, दखल घेत नाहीत. वारंवार दूषित पाण्याबाबत ग्रामसेवक यांच्याकडे तक्रार करून ही गेली तीन वर्षे ग्रामस्थ व्यथा वेदना मांडत आहेत. परंतु ग्रामसेवक कर्णे लक्ष घालून ग्रामस्थांना स्वच्छ कसा पाणी पुरवठा होईल यासाठी झटत नाहीत. या दूषित पाण्यामुळे ग्रामस्थ आजारी पडत आहेत. ग्रामसेवक हा जनतेचा लोकसेवक आहे. त्याने राजकारणापासून दूर राहिले पाहिजे. तो सरकारी नोकरदार आहे. तो गावात मोठ्या प्रमाणावर राजकारण करीत आहे असे निवेदनात म्हटले आहे. ग्रामसेवक कर्णे याची दफ्तर तपासणी झालेली नाही. ती जिल्हा अधिकारी साहेब सोलापूर यांनी तात्काळ करावी व त्यांच्यावर खाते अंतर्गत कारवाई करण्यात यावी. गावाला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा. गाव रोगमुक्त राहील याची काळजी घ्यावी. या दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांचे बरे वाईट झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार ग्रामसेवक कर्णे हा राहील. दिलेल्या निवेदणानुसार गावाला स्वच्छ पाणी पुरवठा १५ दिवसाच्या आत न केल्यास या निवेदनाची दखल न घेतल्यास गट विकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल असे निवेदनात बाबुराव मारुती खिलारे (भाजप माळशिरस तालुका अध्यक्ष अनुसूचीत जाती मोर्चा) यांनी निवेदणाद्वारे केले आहे. या निवेदणाच्या प्रती मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, मा.उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, मा.आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, मा.पाणी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, मा.विभागीय आयुक्त पुणे, मा.जिल्हाधिकारी साहेब सोलापूर, मा.प्रांत साहेब अकलुज, मा.तहसिलदार साहेब अकलूज, मा.रामभाऊ सातपुते साहेब विधानसभा माळशिरस यांना माहितीसाठी देण्यात आलेल्या आहेत. 

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

    

Comments