Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

वाखरी गाव हे महाराष्ट्रातील डेंगू, चिकनगुणिया, मलेरिया इ. रोगाचे केंद्र बनेल अशी गंभीर भयानक परिस्थिती, जनतेमध्ये घबराट

पंढरपूर : बहुजन भूषण वृत्तपत्र

संपादक  आढळून आलेल्या माहितीनुसार वाखरी ता.पंढरपूर जि.सोलापूर या गावात जनावरे पाळणारे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी वाखरी गावात, गल्लीत, रस्त्यावर, वाखरी ग्रामपंचायत गावठाणात शेणाचे उकिरडे केले आहेत. त्या शेणामुळे दुर्गंधी, काळे किडे, डास, चिलटे, आळया इ. झाल्या आहेत. हे उकिरडे ज्या ठिकाणी ग्रामस्थ राहत आहेत त्या ठिकाणी केलेले आहेत. त्या ठिकाणावरून लहान मुले, तरुण, वृद्ध महिला, पुरुष ये जा करीत असतात. वाखरी गाव हे अ स्वच्छ गाव असे झाले आहे. याला सर्वस्वी जबाबदार जनावरे पाळणारे ग्रामस्थ आहेत. तसेच आठवले यांचे बहुजन भूषण कार्यालय याच्या पुढे उकिर्डा असून त्याच्यामुळे अनेकांना आजार होऊ लागले आहेत. तसेच कार्यालयाच्या मागे तेथील ग्रामस्थांनी मुद्दाम खोडसाळपणाने जनावरे बांधलेली आहेत त्यामुळे प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. हे कार्यालय कचाट्यात सापडले आहे. तरी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांनी गावातील जनावरे धारक व्यक्ति यांना गाव व परिसर, गल्ली, रस्ते स्वच्छ ठेवण्याबाबत नोटिसा काढण्यात यावेत. जर जनावरे पाळणारे ऐकत नसतील तर ग्रामपंचायतने त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखला करावा. कचरा गाडी नेण्यासाठी घंटा गाडी आहे परंतु त्याचा उपयोग ग्रामस्थ करीत नाहीत. पावसाळा चालू आहे. वाखरी गावात कोठूनही जावा त्या ठिकाणी जनावरे धारकांनी शेणाचे उकिरडे केलेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. काळे किडे, डास, चिलटे, आळया झाल्या आहेत. त्यामुळे डेंगू, चिकनगुणिया, मलेरिया असे रोग होतील अशी परिस्थिती आहे. जनावरे पाळणारे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. जनावरे पाळणार्‍या ग्रामस्थांनी शेणाचे उकिरडे केल्यामुळे डेंगूचे लागण होईल असे चित्र आहेत. ग्रामपंचायतने अशी दुर्गंधी करणार्‍या व स्वच्छता न राखणार्‍या ग्रामस्थांना लेखी नोटीसीद्वारे समज देण्यात यावी. जनावरे पाळणार्‍या ग्रामस्थामुळे अनेक व्यक्ति दगावतील तर याला जबाबदार कोण? याकडे ग्रामपंचायत कारभारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. वाखरी गावापासुन डेंगू, चिकनगुणिया, मलेरिया या रोगाची लागण झाल्यास याला जबाबदार कोण धरायचे? व या गावापासून महाराष्ट्रात साथ पसरेल अशी परिस्थिति निर्माण झाली आहे. तरी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांनी तातडीने लक्ष घालावे तसेच ज्या ज्या ठिकाणी उकिरडे आहेत ते हटवावेत व रस्त्यावर जनावरे बांधणारे जे ग्रामस्थ आहेत त्यांनाही रस्त्यावर जनावरे बांधू नयेत यासाठी लेखी नोटिस द्यावी. यामध्ये गावाचे हित आहे. वाखरी गावात डेंगूची लागण झाल्यास अनेकांना जीव गमवावा लागेल. या घाणीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही साथ पसरल्यास, ही साथ आटोक्यात येईल असे वाटत नाही. तसेच सध्या जनावर यांच्यावर लंपी रोगाचे संकट आले आहे. गावात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी जनावरे पाळली आहेत तसेच अभिमान (दादा) साळुंखे यांची सून सध्या सरपंच आहेत. अभिमान साळुंखे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे सुनेच्या कालावधीमधील  वाखरी गाव आदर्श गाव बनवतील असे जनतेमध्ये बोलले जात आहे. तसेच गटारी तुडुंब घाणीने भरलेले आहेत. त्या स्वच्छ करणे गरजेचे आहेत. तसेच काही ठिकाणी गटारावरील फरशा फुटलेल्या आहेत त्या बसविण्यात याव्यात हीच अपेक्षा.       

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

 

 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...