Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

नातेपुते नगरपंचायतची वाटचाल प्रगतीच्या दिशेने: मा.श्री.बाबाराजे(दादा) देशमुख (माजी जि.प.सोलापूर उपाध्यक्ष)

 

मा.श्री.बाबाराजे(दादा) देशमुख
(माजी जि.प.सोलापूर उपाध्यक्ष)

उपसंपादक :बहुजन भूषण वृत्तपत्र

          नातेपुते ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाले त्यामुळे नातेपुते नगरीच्या ग्रामस्थांच्या विकासासाठी अपेक्षा असून रस्ते, पाणी, वीज, गटार आरोग्य इ.वर नगरपंचायत लक्ष देणार आहे. महात्मा गांधी, लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने नातेपुते नगरपंचयातच्या बक्षीस वितरणावेळी मा.श्री.बाबाराजे (दादा) देशमुख, माजी जि.प.सोलापूर उपाध्यक्ष म्हणाले की, महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वतंत्र मिळवून दिले. लाल बहादुर शास्त्री यांनी जय जवान जय किसान असा नारा देवून जनतेला न्याय दिला. नातेपुते नगरपंचायत व्हावी यासाठी ग्रामस्थांनी, सदस्यांनी, उपोषणे केली त्यामुळे हे शक्य झाले. तसेच कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे झालेल्या उणिवा करण्यास ग्रामपंचायतची ताकद खर्च झाली. यापुढे नव्याने नगरपंचयात महात्मा गांधींच्या स्वप्नातील स्वच्छ शहर व सुंदर शहर होईल. जनतेच्या अपेक्षा आहेत त्या सोडविण्यासाठी सर्व पदाधिकारी कटिबद्ध राहतील असे देशमुख साहेब म्हणाले. तसेच उपनगराध्यक्ष मालोजीराजे (आबासाहेब) देशमुख यांनी नगरपंचायतने राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी नगराध्यक्ष उत्कर्षाराणी पलंगे, प्रशांत सरूडकर यांनी महात्मा गांधी, लाल बहादुर शास्त्री यांचे विचार मांडले. यावेळी विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जि.प.सोलापूर माजी उपाध्यक्ष मा.श्री.बाबाराजे देशमुख, रघुनाथ (अण्णा) कवितके चेअरमन अहिल्या पतसंस्था, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, नगराध्यक्ष उत्कर्षाराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, सार्वजनिक बांधकाम सभापती अतुल (बापू) पाटील, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, नातेपुते पोलिस स्टेशनचे सपोनि प्रवीण संपांगे साहेब, मुख्याधिकारी माधव खांडेकर, प्रशांत सरूडकर, नगरसेवक अविनाश दोशी, रणजीत पांढरे, अण्णा पांढरे, अॅड.रणवीर देशमुख, माऊली उराडे, उद्योगपती अतुल बावकर, नगरसेविका अनीता लांडगे, शर्मिला चांगण, नंदकुमार देशपांडे, सुरेश वहिकर, प्रवीण बडवे, रवींद्र चांगण, आप्पा भांड, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार इ. उपस्थित होते.

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

 

 

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...