भीमाकोरेगाव येथील विजयीस्तंभाला जात असताना आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी “झेंडा लहान पण दांडा मोठा ठेवावा”. अभिमन्यु बी. आठवले
१ जानेवारी भीमाकोरेगाव विजयस्तंभ संपादक (बहुजन भूषण वृत्तपत्र) सर्व बांधवांनो १ जानेवारी रोजी भीमाकोरेगाव येथे विजयीस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण जात असतो. भीमा कोरेगाव विजयस्तंभ हा आपली अस्मिता आहे त्या पवित्र भूमिस व शूर आपल्या बांधवांना विनम्र अभिवादन करण्यासाठी कुटुंबासोबत जात असतो. भीमा कोरेगावचा विजयस्तंभ म्हणजे १ जानेवारी १८१८ साली पेशवे आणि ब्रिटिश यांच्यामध्ये झालेल्या लढाईमध्ये पेशवांच्या प्रचंड म्हणजे ४३ , ८३७ सैनिकांना केवळ ८३२ महार सैनिकांनी चोख उत्तर देवून पेशव्यांना पराभूत केले हा इतिहास आहे. बांधवांनो सध्या समाजकंटकांना हाताशी धरून त्यांना बळ देवून जातिवादी विनाकारण वादविवाद घडवून आणण्यासाठी दृष्टहेतूने वातावरण गढूळ करण्याचे कटकारस्थान करतील. बांधवानो गाफिल राहू नका , सोबत पाणी , जेवण घेवून जावा. शासकीय यंत्रणा तुमच्या गाड्यांची चौकशी करीत असताना तुम्ही गाडीजवळ स्वत: थांबा , गाडीपासून दूर जाऊ नका. तुमच्या गाडीत एखादी वस्तु ठेवून तुम्हास अडकवण्याचा डाव रचतील. भीम सैनिकांनो नम्रपणे अभिवादन करा. नेत्यांनो भड...