मा.श्री.डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील सोलापूर जिल्हाध्यक्ष काँग्रेस (आय) |
मा.श्री. अॅड. रामहरी रूपनवर उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) |
संपादक
सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस (आय) पक्ष कमकुवत
झाला होता. सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार झाला असे सर्व जनतेलाच वाटत होते. त्यामुळे
या काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी कार्यकर्ते यांची मानसिकता नव्हती. काँग्रेस
पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी मा.श्री.डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांची निवड वरिष्ठ
नेत्यांनी केली आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. काँग्रेस पक्ष रसातळाला गेला होता. या पक्षाचे नाव घेण्या
इतपत जनतेची मानसिकता नव्हती. या पक्षाचे या अगोदर पदाधिकारी झाले पण त्याचा उपयोग
फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी केला आणि कार्यकर्त्यांना वार्यावरती सोडले. काँग्रेस
पक्ष नावाला उरला आहे असे चित्र दिसत होते.
असे असताना मा.श्री.डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे काँग्रेस (आय) पक्षाच्या जिल्हाध्यक्ष
पदाची सूत्रे आली आणि वातावरण बदलून गेले. जिल्हास्तरीय,
तालुकास्तरीय, गाव भेटी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी यामुळे काँग्रेस
पक्षाला बळ आले. मा.श्री.डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील
यांच्यामुळे काँग्रेस पक्षाला बाळसे आले. दादासाहेबांचा झंझावती दौरा कार्यकर्त्यांसाठी
वरदान ठरत आहे. दादांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे घेतली आणि बघताबघता काँग्रेस
पक्ष नाहीसा झालेल्या पक्षाला उभारी आली, जीवदान मिळाले. काय होता पक्ष आणि काय झाले
पक्षाचे अशी परिस्थिति पहायला मिळत आहे. हा ढाण्या सिंह गरजणार,
त्याचा आवाज चहूबाजूंनी घुमणारच. काँग्रेस पक्षाला दादासाहेबांमुळे बळकटी आली. नेता
खमक्या व जीवाभावाचा असेल तर पक्ष भक्कमच होणार यामध्ये शंका नाही. कोमात गेलेला काँग्रेस
(आय) पक्ष डॉ.धवलदादांसाहेबांमुळे जोमात येवू लागला. वडील मा.प्रतापसिंह मोहिते-पाटील
यांनी काँग्रेस पक्ष वाढविला होता. शासनदरबारी दहशत होती. कार्यकर्त्यांनी काम सांगितले
आणि पप्पा साहेबांनी ते केले नाही असे घडले नव्हते. अधिकार्यावरती वचक होता.
त्यामुळे अधिकारी कामचुकारपणा करीत नव्हते. त्वरित दखल घेवून कार्यकर्त्यांचे प्रश्न,
अडिअडचणी सोडविल्या जात असत. त्यांचेच सुपुत्र डॉ.धवलदादा साहेब आहेत. धमक असलेला
नेता काँग्रेस पक्षाला लाभल्यामुळे काँग्रेस पक्षाची वाटचाल अगदी जोमाने पुढे नेण्यासाठी
दादासाहेब दौरे करीत आहेत. काँग्रेस पक्षाला मा.श्री.डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील
यांच्यामुळे जीवदान मिळाले असे म्हटले तरी गैर नाही. नेता दमदार तर पक्ष जोमदार होणारच.
माळशिरस तालुक्यात जिल्हापरिषद, पंचायत समिति गटात, नगरपंचायत, नगरपरिषद यामध्ये बैठका
घेवून मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या सभेला प्रचंड युवक, आजी-माजी यांचा प्रतिसाद
मिळत आहे. नातेपुते येथे १९/१०/२०२१ रोजी राज वैभव कार्यालय येथे बैठक पार पडली.
या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) चे उपाध्यक्ष माजी आमदार मा.श्री. अॅड.
रामहरी रूपनवर, जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील, शिवाजीराव बिराजदार, भीमाशंकर
बाळगे, बीडवे, माणिकबापू मिसाळ, पांडुरंग देशमुख, अण्णासाहेब ईनामदार, शिवाजीराव इंगोले-देशमुख,
अण्णासाहेब रूपनवर, अॅड.विलास पिसाळ, डॉ.आदिनाथ रूपनवर, संतोष काळे, बाळासाहेब
पांढरे, दुर्योधन पाटील, सुभाष सोरटे, अप्पासाहेब रूपनवर, संग्राम भोसले, सुनील
मोरे, सौरभ रूपनवर, महेश पाटील, अविनाश कर्चे, विजय अर्जुन, नौशाद आतार इ.मान्यवर व
असंख्य युवक वर्ग उपस्थित होता.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच
वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.