संपादकमा.श्री.मिलिंद शंभरकर साहेब
(जिल्हाधिकारी सोलापूर)
सोलापूर जिल्हाधिकारी
मिलिंद शंभरकर साहेब यांनी यांनी या कोरोना कोव्हिड-१९ या आपत्ती काळात जनतेच्या हिताच्या
दृष्ठीने जेवढे शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी सतत लक्ष दिले. हळूहळू कोरोना
या रोगाची आपत्ती कमी होत आहे. शेतकर्यासाठी पीक कर्ज याबाबत चांगला निर्णय घेवून
त्यांची प्रगती व्हावी. त्यांना आपत्ती काळात आधार मिळावा यासाठी कर्तव्य बजावले. कोरोना
या रोगाचे संकट जनतेसाठी भयानक होते असे असताना पोलिस खाते, प्रांत, तहसिलदार, गटविकास अधिकारी, सर्व विभागातील शासकीय कर्मचारी तसेच सहकार्य करणारे स्वयंसेवक व अतिशय महत्वाची
जबाबदारी पार पाडत आहेत ते म्हणजे डॉक्टर व कर्मचारी व सर्व आरोग्य विभाग. आपत्ती काळात
जागृत राहून आपली कामगिरी पार पाडत आहेत. जिल्हाअधिकारी सोलापूर यांचे नाव मिलिंद शंभरकर
जरी असले तरी ते एक नंबर जिल्हाधिकारी म्हणून सोलापूर जिल्ह्यातील जनता त्यांची ओळख
पुसणार नाही. असे जिल्हाधिकारी पदाला शोभिल अशी कामगिरी करून एक ठसा उमटिवला आहे. काही
निर्णय हे जनतेला पटणारे नसले तरी ते जनतेच्या हिताच्या दृष्ठीने होते म्हणून मानसिकता
कठोर करून जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेतले. काही वेळा जनतेचा रोष पत्करावा लागला तरी
ते आपल्या मतावर जनतेसाठी ठाम राहिले. जनतेने जिल्हाधिकारी साहेब यांच्यावर आरोप, प्रत्यारोप केले. कारण जनता संचार बंदीला कंटाळली आहे. सतत लॉकडाऊन यामुळे
जनतेला वैताग आलेला होता. पण जिल्हाधिकारी यांनी पदाचा दुरुपयोग “हुकुमशाही” म्हणून
केला नाही. तर जनतेचे हित पाहिले. कर्तव्य करत असताना कुचराई, टाळाटाळ, दफ्तर दिरंगाई केलेली दिसत नाही. परंतु जिल्हाधिकारी
कार्यालयात साजरा होणारा लोकशाही दिनात जे जनतेने दिलेले निवेदने, अर्ज त्याचे मात्र जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडून म्हणावा तसा अर्जदार, निवेदन देणारे व्यक्ति यांना मात्र न्याय देण्यात त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास
त्या अर्जाचे, निवेदनाचे निवारण करण्यास जिल्हाधिकारी साहेब कमी
पडतात असे जनतेतून बोलले जाते. तसेच संपादक म्हणून मी अनुभवले आहे. लोकशाही दिनात दिलेल्या अर्जानुसार
त्वरित दखल घेवून, निवारण करून न्याय देणे ही जनतेची अपेक्षा
आहे. जनतेने लोकशाही दिनात अर्ज दिल्यानंतर फक्त खालील अधिकार्याकडे पत्र व्यवहार
केले जातात परंतु खालील अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या पत्राला दाद देताना दिसत नाहीत.
खालील अधिकारी हे दफ्तर दिरंगाई, टाळाटाळ करीत असल्यामुळे त्या
अधिकार्यावरती जिल्हाधिकारी साहेब यांनी शिस्तभंगाची कारवाई करावी असे वाटते. लोकशाही
दिनातील दिलेल्या अर्जाचे, निवेदनाचे जिल्हाधिकारी यांनी स्वत:
लक्ष घालून निवारण करून अडचण असल्यास त्या अर्जदाराला मार्गदर्शन करावे. त्याचप्रमाणे
लोकशाही दिनादिवशी सर्व विभागाचे अधिकारी हजर असले पाहिजेत. अर्जदाराच्या अर्जाची, निवेदनाची दखल घ्यावी. लोकशाही दिन वरदान ठरावा. त्याचप्रमाणे आपण सोलापूर
जिल्हाधिकारी हजर राहिल्यापासून उत्कृष्ट निर्णय घेत आहात. आपण कर्तव्य पार पाडत आहात.
आपली आदर्श कामगिरी ठरत आहे.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच
वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.