संपादक
नातेपुते येथे ०७/१०/२०२१ रोजी मधुर मिलन, नातेपुते या मंगल कार्यालयामध्ये ग्रामसुरक्षा या चांगल्या उपक्रमाचे आयोजन करण्यात
आले. हा उपक्रम सोलापूर ग्रामीण पोलिस दल व जिल्हा परिषद सोलापूर संयुक्त उपक्रम राबविला
जात आहे. हा उपक्रम जिल्हा पोलिस अधिक्षक सौ.तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नातून राबविला
जात आहे. या शिबिराच्या वेळी अकलुज विभागाचे पोलिस अधिकारी मा.श्री.शिवपूज तसेच नातेपुते
पोलिस स्टेशनचे एपीआय मनोज सोलनकर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन, दरोडा, बिबट्याचा हल्ला, सर्पदंश, पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, आग जळीताची घटना, अपघात, याबाबत डी.के.बोर्डे संचालक
नागरी सुरक्षा पुणे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा जनतेसाठी कशी फायद्याची आहे ते समजावून
सांगितले व त्यावेळी प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रत्येकाच्या जीवनात वेळ आणि काळ
ठरलेला आहे. कोणते संकट कधी येईल हे सांगता येत नाही. संकटाच्या वेळी मदतीला कोण येईल
तर ते म्हणजे ग्रामसुरक्षा यंत्रणेतील पोलिस अधिकारी व कर्मचारी व जनता. कोणत्याही
व्यक्तीवरती संकट आले तर क्षणात सगळीकडे ग्रामसुरक्षा यंत्रणेचा जो नंबर आहे तो म्हणजे
१८०० २७० ३६०० असा डायल केल्यास कोणावरती संकट आले तर त्याची माहिती त्वरित जनतेपर्यंत
पोहोचते व त्याप्रमाणे त्वरित त्या घटनेच्या ठिकाणी तेथील गाववाले पोहचवून त्या संकटाची
दखल घेवून ते संकट घालवू शकते त्यामुळे ही यंत्रणा जनतेसाठी वरदान ठरेल. चांगला उपक्रम
आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणा संकटावर रामबाण इलाज असू शकेल असे वाटते. ही यंत्रणा जनतेची
हित पाहणारा असा उपक्रम आहे. या उपक्रमाचे जनतेतून सर्वत्र कौतुक होत आहे. या शिबिराला
नातेपुते पोलिस स्टेशन अंतर्गत येणारी असंख्य गावे वाड्या, वस्त्या
त्या गावचे पोलिस पाटील, सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी, व्यापारी वर्ग, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, महिला व सामाजिक
कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या उपक्रमाला जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला.
यावेळी पत्रकार मोठ्या संखेने उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी उपनिरीक्षक
श्री.पवार, बैनवाड तसेच बीट अमलदार यांनी परिश्रम घेतले.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच
वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.