वैभव अ. आठवले (उपसंपादक) (साप्ताहिक बहुजन भूषण) |
संपादक
साप्ताहिक बहुजन भूषण या वृत्तपत्राचे चौथ्या वर्षात पदार्पण होत आहे. यशस्वी वाटचाल होत आहे. या वृत्तपत्राला वाचक, जाहिरातदार यांनी जाहिराती देवून सहकार्य केले. गेली 2 वर्षे कोरोना कोव्हिड-१९ या रोगाच्या आपत्तीमध्ये ही संपादकाने जनहितार्थ म्हणून साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्राच्या सोशल मीडिया पेज वरून वाचकापर्यंत जे दिसले, जे वाचले, जे अनुभवले त्या नुसार सडेतोड निर्भिडपणे विचार मांडले. साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र चौथ्या वर्षात तर, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र आठव्या वर्षात पदार्पण करीत आहे. यशस्वी घौडदौड चालू आहे. या वृत्तपत्रांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्था, विविध सामाजिक संघटना,पतसंस्था, लहान-मोठे सामाजिक कार्यकर्ते, वाचक, जाहिरातदार इ. नी भरभरून आशीर्वाद दिला त्या बद्दल सर्वांचे अभिनंदन. त्यामुळे वृत्तपत्र चालवणे सोपे झाले. सध्या स्पर्धेचे युग चालू आहे. अशा या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विषय शोधून त्यावरती प्रबोधनवादी, परिवर्तनवादी, कधी मवाळवादी, तर कधी जहालवादी विचार संपादक रोखठोकपणे मांडत आहेत व ते सर्व समाजप्रिय बांधवांना आवडतात यामुळे विचार मांडण्यास बळ मिळते. न्याय, अन्याय, अत्याचार यावरती आवाज उठवण्यासाठी या वृत्तपत्राने मोलाची कामगिरी बजावली आहे. हे वृत्तपत्र वाचनीय झाले आहे. विचाराची सिदोरी या वृत्तपत्रातून वाचकांना मिळत आहे. "ना नफा ना तोटा" या धरतीवरती सामाजिक जबाबदारी समजून व्यवसाय धारकांच्या व्यवसायाची माहिती ग्रामीण शहर, शासकीय, निमशासकीय या कार्यालयापर्यंत व जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम हे वृत्तपत्र करीत आहे. कोरोना कोव्हिड-१९ या रोगाच्या आपत्ति देशावर व देशातील जनतेवर कोपली. या कालावधीमध्ये होत्याच नव्हतं झाल ही आपत्ति असंख्य कुटुंबावर घात करून गेली. या आपत्तीत कोणाचा बाप, कोणाचा मुलगा, मुलगी, नवरा, नातेवाईक यांचा अंत झाला. तर काही मुले आई बापा विना निराधार झाली. त्यामध्ये पुर परिस्थिती, राजकीय मंडळीचे संकट अशी संकटे आली. या आपत्ती काळाने दूरावा निर्माण केला. या आपत्ती काळाने कोणीही कोणाचा नाही हे दाखवून दिले. ही भयानक परिस्थिती जनतेने भोगली आहे. आता कुठे तरी परिस्थिती नियंत्रणात येत आहे. प्रत्येकाच्या सुखा दुखात वृत्तपत्राने व्यथा, वेदना मांडल्या आहेत. सर्वांच्या कृपाआशीर्वादाने या वृत्तपत्राची घौडदौड चालू आहे. कोणत्याही क्षेत्रातील व्यवसायाची जाहिरात असुदया बहुजन भूषण या वृत्तपत्राकडे द्या. तुमच्या व्यवसायाची माहिती सर्वत्र पोहोचवण्यासाठी हे वृत्तपत्र काम करेल. वृत्तपत्राचा वर्धापन दिन चालू आहे, दसरा, दिवाळी येत आहे. आपल्याकडील लेख, व्यवसायाच्या जाहिराती, प्रसिद्धी करण्यासाठी सहकार्य करा. घाबरून जावू नका, साप्ताहिक बहुजन भूषण हे वृत्त पत्र आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तुमचा आशीर्वाद लाभल्यानेच हे वृत्तपत्र जोमाने वाटचाल करीत आहे. चांगल्या कामासाठी "शाब्बासकी", तर वाईट कामाचा "पंचनामा" करते. अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे वृत्तपत्र म्हणून साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्राने नाव कमविले आहे.
जनहितार्थ
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल,
जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.