संपादक
दि.२५/०९/२०२१ व २६/०९/२०२१ रोजी घेण्यात
येणार्या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड मधील विविध पदाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या त्यामुळे विद्यार्थी पालक यांना मनस्ताप
सहन करावा लागला आहे. परीक्षा असल्यामुळे विद्यार्थी यांनी आपआपल्या परीने परीक्षा
देण्यासाठी, वेळेत पोहोचण्यासाठी काही विद्यार्थी एक
दिवस अगोदर, तर काही विद्यार्थी नातेवाईकांकडे, काही विद्यार्थी मित्रांकडे, तर काही विद्यार्थी यांनी
एसटी स्टँड, लॉज याचा आधार घेतला होता. वेळ, पैसा, मानसिक त्रास सहन करून परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी
दक्ष होते. परंतु अचानक परीक्षा रद्द केलेचा मेसेज सर्वत्र पसरला आणि एकच खळबळ उडाली.
विद्यार्थी आपआपल्या मित्रांना “खरी की खोटी” बातमी एकमेकांना विचारत होते.
विद्यार्थी महाराष्ट्र सरकारच्या एकाएकी घेतलेल्या निर्णयामुळे चकित झाला, संकट कोसळले, घायाळ झाले, विद्यार्थी
यांची केवळवाणी अवस्था झाली. नक्की परीक्षा रद्द करण्याचा महाराष्ट्र सरकारचे कारण
काय? विद्यार्थी यांच्या जीवाशी खेळण्याचा महाराष्ट्र सरकारचा
हेतु होता काय? परीक्षा रद्द करायची वेळ का आली? परीक्षा घेण्याची मानसिकता नव्हती तर परीक्षेचे वेळापत्रक का काढले? महाराष्ट्र सरकारने परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय घेतला तो चीड आणणारा
व चिंताजनक आहे. महाराष्ट्र सरकार विद्यार्थी यांच्या जीवाशी खेळत आहे असे वाटते. शिकून
पडलेली मूल नोकरी मिळेल या उद्देशाने वेळ, पैसा, मेहनत, मानसिक त्रास सहन करून परीक्षेसाठी तयारी करत
असतात. महाराष्ट्र सरकार यांनी परीक्षा रद्द केली हे चुकीचे व वेदनादायी व गंभीर बाब
आहे . असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितील असतात परंतु शिक्षण
वाया जाऊ नये यासाठी परीक्षा देवून नोकरी लागेल, आई वडिलांच्या
घामाचे चीज होईल असे असल्यामुळे परीक्षा देत असतात. परंतु सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे
विद्यार्थी यांना त्याचा पश्चाताप भोगावा लागत आहे. परीक्षा रद्द करायची होती तर परीक्षेचे
वेळापत्रक तयार का केले? महाराष्ट्र सरकारने झोपीत वेळापत्रक
तयार केले काय? महाराष्ट्र सरकारने डोक ठिकाणावर ठेवून निर्णय
घ्यायला पाहिजे होता. विद्यार्थी यांनी जीवाचे बरेवाईट करून घेतले तर याला जबाबदार
महाराष्ट्र सरकारच असेल. परीक्षा रद्द करून सरकारने आनंद घेतला काय? महाराष्ट्र सरकारने तीन पक्षाच्या आघाडीतील मतभेद चुलित घाला, जनतेचे हित बघा, उद्योगधंदे सुरू करा, युवकांच्या हाताला रोजगार द्या, सर्व विभागाच्या रिक्त
जागा भरा, मुलांना नोकरी द्या, विद्यार्थ्यांना
भ्रम निराश करू नका. परीक्षा रद्द करण्या मागचा सुत्रधार कोण? या परीक्षेवेळी विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र, जिल्हा, यामध्ये चुका झाल्या त्या चुका कर्मचारी यांनी दारू पिऊन केल्या काय? परीक्षा रद्द करण्याचे कारण काय याची चौकशी झाली पाहिजे असे संस्थापक बहुजन
राष्ट्र शक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे अभिमन्यु बी.आठवले यांनी प्रसिद्धीद्वारे
मागणी केली आहे.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच
वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.