संपादक
नातेपुते ता.माळशिरस,
जि.सोलापूर या ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाल्याने व काही कालावधीमध्ये
निवडणुका होणार असल्यामुळे नगरसेवक होण्यासाठी युवकांची वळवळ सध्या चालू झाली आहे.
लहान थोरांच्या गाठीभेटी, चहापाणी, बसणे-उठणे, वाढदिवस अशा पद्धतीने चालू झाले आहे. वार्ड
रचणेत बदल अपेक्षित आहे. तसेच आरक्षण सोडत महिला, पुरुष तसेच कोणत्या जातीला मिळेल याकडे लक्ष
लागून राहिले आहे. नातेपुते येथे युवकांचे गटतट सामाजिक कामे करण्यासाठी पुढे आलेले
आहे. प्रत्येकाच्या सुखादुखात सामील होत आहेत. मतभेद विसरून नमस्कार,
चमत्कार चालू आहेत. नातेपुते ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर झाल्यामुळे प्रथम
नगरसेवक व नगराध्यक्ष होण्याचा मान मिळावा या दृष्ठीने नेते मंडळी युवक वर्ग आत्तापासूनच
चर्चेला सुरुवात केलेली आहे. ही निवडणूक चुरशीची होणार का?
एक एक मत नगरसेवक बनण्यासाठी महत्वाचे आहे. तसेच नगराध्यक्ष जनतेतुन निवडला जाईल काय?
असे जनतेतुन बोलले जात आहे. तसेच यामध्ये कोणाकोणाची युती होणार?
आघाडी कोणाची राहणार? हे ही महत्वाचे ठरणार आहे. ही निवडणूक माणुसकी
आणि आर्थिक यावरती अवलंबून असणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतमध्ये असताना यापूर्वी
सरपंच, उपसरपंच, सदस्य म्हणून पदे भूषवले आहेत परंतु त्यांनी
काय कामे केली त्यावरून मतदार मत देताना विचार करतील असेही चित्र आहे. ही निवडणक “पैसा
फेको, तमाशा देखो” या धरतीवरती होईल असेही जनतेतुन बोलले जात
आहे. तसेच ग्रामपंचायतच्या वेळी बिनविरोधी सदस्य झालेले होते यावेळी असे होईल असे सांगता
येत नाही. युवक यावेळी निवडणूक लावणारच, बिनविरोध नगरसेवक होऊ देणार नाहीत अशी खमंग
चर्चा चालू आहे. माळशिरस तालुका विधान परिषदेचा आमदार ठरवणार आहे यामध्ये शंका नाही.
महाळूंग, अकलुज, माळेवाडी (अ),
माळशिरस, नातेपुते यामधील नगरसेवक व नगराध्यक्ष घराणेशाहीतील उमेदवार
विधानपरिषदेसाठी उभा असेल तर हे नगरसेवक वेगळा विचार करणार यात शंका नाही असेही चित्र
दिसते. नातेपुते येथे नगरसेवक होण्यासाठी युवकांची वळवळ चालू झाली असून येणार्या कालावधीमध्ये
होणार्या निवडणुकीत कोण नगरसेवक म्हणून बाजी मारणार याची चर्चा चालू आहे. नगरपंचायत
झाल्यामुळे मोठा निधि येणार असून त्यामधून
विकास होईल की नाही हे येणारा काळच ठरवेल. सध्या युवकांचे या कालावधीमधील वाढदिवस,
मनोमिलन होण्यासाठी कारण ठरत आहे. निवडणूक लढवण्यासाठी अपक्ष उमेदवार मोठ्या प्रमाणात
निवडणूक रिंगणात उतरतील अशी अपेक्षा आहे. ही निवडणूक रंगदार होईल असे वाटते. या निवडणुकीत
कमळ विरोधी घड्याळ असा सामना होईल असे चित्र आहे. यामुळे कमळ फुलणार की कोमजणार, घड्याळ वेळ दाखवणार की बिघडणार हे येणार्या कालावधीमध्ये दिसेल. त्याचप्रमाणे
नागरिकांतून अशी चर्चा होत आहे की, ज्या उमेदवाराचे नाव ज्या वार्डात आहे त्या
वार्डात निवडणूक न लढवता दुसर्या वार्डात निवडणूक लढवत असल्यास त्याचा विचार मतदार
करतील से वाटत नाही. त्यावेळी स्थानिक त्या वार्डातला उमेदवार असेल त्यांनाच मतदार
मतदान करतील असे जनतेतून बोलले जात आहे.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल,
जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.