संपादक
सोलापूर जिल्हास्तरीय
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन हा चांगला उपक्रम राबविला जात आहे. जनता वेळ, पैसा, मानसिक त्रास सहन करून लोकशाही दिनात आपल्या असलेल्या
अडचणी त्या संदर्भात लेखी, अर्ज, निवेदने
देवून अर्जदार पोच घेवून घरी परततात. परंतु दिलेल्या अर्जदाराच्या अर्जदाराच्या निवेदनाला
अधिकारी यांच्याकडून “ना न्याय ना निवारण” होताना दिसत नाही. मी संपादक म्हणून अनुभवले
आहे. अर्जानुसार त्या त्या विभागाकडे लोकशाही दिनातील आलेले अर्ज पाठविले जातात. अहवाल
मागवला जातो. परंतु त्यातून अर्जदाराला न्याय ही मिळत नाही आणि त्याच्या लेखी म्हणण्याचे
निवारण ही होत नाही. म्हणायला लोकशाही दिन बरा वाटतो. पण या दिनातील अर्जदाराच्या अर्जाचे, निवेदनाचे म्हणावी तशी दखल घेताना दिसत नाही. लोकशाही दिन म्हणजे अर्जदाराचे
म्हणे समजून त्यावरती त्वरित न्याय देणे, अडचण असल्यास शासकीय
स्तरावर त्या अर्जदाराला मार्गदर्शन करणे, निवारण करणे असे असले
पाहिजे. तसेच लोकशाही दिनात सर्व विभागाचे वरिष्ठ, कनिष्ठ अधिकारी
हे हजर राहिले पाहिजेत. लोकशाही दिन म्हणजे न्यायदिन जनतेसाठी वरदान ठरला पाहिजे. परंतु
या लोकशाही दिनातून जनतेच्या अर्जाला, निवेदनाला काहीही महत्व
अधिकारी देताना दिसत नाही. “ तू रडल्या सारखं कर, मी मारल्या
सारखं करतो” हेच चाललेले आहे. केवळ अर्जाचे इकडून तिकडे ही मालिका बघायला मिळत आहे.
मी लोकशाही दिनात असंख्य अर्ज दिले आहेत. परंतु “ना न्याय ना निवारण ना दखल” मी अनुभवले
आहे. केवळ निवेदने दिलेल्या अर्जावरून, दिलेल्या पोच वरुन अर्जदाराला
अशीही बनवाबनवी अशी खेळी अधिकारी वर्गाची चालू आहे. लोकशाही दिनात अर्ज देणे आणि पोच
घेणे हेच अर्जदाराच्या नशिबात आहे. परंतु न्याय मिळताना दिसत नाही ही गंभीर व चीड आणणारी
भयानक परिस्थिती आहे. लोकशाही दिन हा अर्जदारासाठी शाप ठरत आहे. लोकशाही दिनात अर्जदाराने
दिलेल्या अर्जानुसार न्याय मिळावा अशी अधिकारी यांची भूमिका असायला पाहिजे. दफ्तर दिरंगाई
कायद्याचा आदर राखून अधिकारी यांनी कर्तव्य समजून न्याय देणे असायला हवे. परंतु टाळाटाळ
ही अधिकारी यांची मालिका चालू आहे. लोकशाही दिन लोकाचे हित पाहणारा, हक्क मिळवून देणारा यासाठी असायला हवा. पण “नाव मोठ आणि लक्षण खोट” असे जिल्हाधिकारी
कार्यालयातील लोकशाही दिन ठरत आहे. जनतेची टिंगल टवाळी करण्यासाठी हा लोकशाही दिन आहे
असे संपादक म्हणून वाटते. अर्जदाराने लोकशाही दिनात दिलेल्या अर्जावरून फक्त टायपिंग
करून पत्राची देवाण घेवाण इकडून तिकडून केली जाते. परंतु निवारण होत नाही, न्याय मिळत नाही, हक्क मिळत नाही, मार्गदर्शन केले जात नाही हे मी अनुभवले आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील
लोकशाही दिन हा जनतेला आधार ठरला जावा यासाठी अधिकारी यांची भूमिका असावी. हीच अपेक्षा.
जनहितार्थ
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे
ध्येय उद्दीष्ट आहे.