संपादक मा. श्री. शरद पवार साहेब यांच्यावरती भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे पवार साहेबांना कोरोना या रोगाची उपमा दिली आहे ती चीड आणणारी आहे , ती वेदनादायी आहे. पवार साहेब कोरोना आहेत असे म्हणणे तुमचे असेल तर याची लागण झाली तर आयुष्यभर क्वारंटाईन व्हावे लागेल आणि जगातील कोणतेही शास्त्रज्ञ व डॉक्टर यांचा इलाज चालणार नाही हे पडळकरांनी लक्षात घेतले पाहिजे. पवार साहेब या भारत मातेचे सुपुत्र आहेत त्यांचा सल्ला , मार्गदर्शन असंख्य नेते घेत आहेत. पवार साहेब मातेचे सोने करणारे आहेत. त्यांच्याबद्दल अशा प्रकारचे बोलून प्रसिद्धी मिळावी या हेतूने बोलणे महागात पडेल. पवार साहेब हे देशातील जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे कल्याणकारी नेते आहेत. त्यांच्यावर उपमा म्हणजे तमाम देशातील जनतेवरील उपमा हे पडळकरांनी लक्षात घ्यावे. स्वत:चे सामाजिक काम काय आहे हे तपासून पहावे. सध्याच्या काळात कोरोना या रोगाने जग घायाळ केले आहे मग पवार साहेबांना कोरोना या रोगाची उपमा देऊन काय साध्य झाले ? तुम्हालाही घायाळ केल्याशिवाय सोडणार नाही. पव...
साप्ताहिक बहुजन भूषण हे वृत्तपत्र प्रबोधनवादी, परिवर्तनवादी, अन्याय-अत्याचार आवाज उठवणारे